भोर (प्रतिनिधी): भोर तालुक्यातील गुंजन मावळमधील खुलशी, गुहीणी, भुतोंडे या गावांच्या परिसरात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे भातशेती व ओढ्यांवरील पूलांचे नुकसान तसेच घरांची पडझड झाली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष बांधावर तसेच घटनास्थळी जाऊन पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रमदाद खुटवड, भोर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष संतोष घोरपडे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गणेश खुटवड यांनी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला.

यादरम्यान ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे आलेल्या अचानक पुरामुळे भुतोंडे येथील कै.अंकुश सोमाजी उतेकर यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही आजारपणाने मृत्यू झाला होता, त्यामुळे त्यांची दोन्ही मुले कु.अजय उतेकर(वय १७) आणि कु.सुप्रिया उतेकर(वय १३) हे अनाथ झाल्यामुळे त्यांना तात्काळ भोर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विक्रमदादा खुटवड युवा मंच च्या वतीने रोख रक्कम २५,०००/- ची मदत करण्यात आली व त्या मुलीच्या १० वी पर्यंत शिक्षणाचा, शालेय साहीत्य व शालेय गणवेशाचा खर्च गुंजवणी शिक्षण संस्था च्या माध्यमातून करण्यात येईल असे मा.विक्रमदादांनी सांगितले.

अधिक वाचा  पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण; निर्बंध लादणार का? आयुक्त म्हणाले…

तसेच या दुखद घटनेमुळे मयत व्यक्तीच्या वारसांना अधिकची मदत मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजितदादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे पाठपुरवा करून जास्तीत जास्त शासकीय मदत त्या मुलांना मिळवून देऊ, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे शेताचे व घराचे नुकसान झाले आहे त्यांनाही योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा असा शब्द विक्रम खुटवड आणि संतोष घोरपडे यांनी दिला.

याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थांपैकी पोलिस पाटील खुलशी तुकाराम पिलाणे,मा.सरपंच सोपान पिलाणे,उपसरपंच,अंकुश घावरे,एकनाथ मोरे ग्रा.सदस्य, दिपक डोंबे, अंकुश माने, गेनबा पिलाणे, किसन पिलाणे, बाबू ढेबे, प्रकाश मोरे, संतोष उफाळे, तानाजी रेणुसे, लताबाई पिलाणे, सुलाबाई पिलाणे, राम गोहीने, ग्रामसेवक ढवळे भाऊसाहेब, किसन रेणुसे, तानाजी रेणुसे, गणपत गोहीने, संजय कंक, विकास कदम, अनिल कदम, अशोक कंक, नवनाथ कंक तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.