पुणे : गेल्या आठवड्यात पुण्यासह कोल्हापूर , सांगली आणि कोकण किनारपट्टीला पावसानं झोडपल्यानंतर आता राज्यात पावसानं काहीसी उसंत घेतली आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण पावसाचा धोका अद्याप कमी झाला नाही. आणखी तीन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. पण 30 आणि 31 जुलै रोजी राज्यात पुन्हा जोरदार पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे.

आज पुण्यासह सातारा, रायगड आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पण उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार आहे. पण विकेंडला पुण्यासह कोकणात पावसाची जोरदार वापसी होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  भारत- रशिया ५१०० कोटींचा सौदा; एके-२०३ रायफल्सचा UPमध्ये सुरु करणार कारखाना

शुक्रवारी 30 जुलै रोजी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर शनिवारी राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे या दोन दिवशी, मुंबईसह पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे खासदार कोल्हेंची कोल्हेकुई? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल

काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता सध्या कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाच्या पट्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील तीन दिवस कोकणात हीच स्थिती कायम राहणार आहे.