करोना प्रतिबंधक लसीचे गुरूवारी कोवॅक्‍सिन आणि कोविशील्ड दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दोन्ही मिळून 192 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रांवर कोविशील्डचे डोस वाढवले असून, आता एका केंद्रावर 200 जणांना लस मिळेल.

कोविशील्ड लस ही 186 केंद्रांवर तर कोवॅक्‍सिन ही लस 6 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. कोवॅक्‍सिनचे प्रत्येक केंद्रांवर 300 तर कोविशील्डचे 200 डोस उपलब्ध असतील. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशील्डच जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 20 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. तर कोवॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.

अधिक वाचा  भाजपवाल्यांच्या माझ्याकडे सीडी, लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : मलिक

दि. 5 मे पूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना गुरूवारी 30 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 30 टक्के ऑन दी स्पॉट दुसरा डोस दिला जाईल.

1 जुलैला कोवॅक्‍सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना गुरूवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे.