पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यावर पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून खड्डे बुजवले जात नाही. त्याच्या निषेधार्थ आज टिळक स्मारक समोरील रस्त्यावरील खड्ड्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडून विट्टी दांडू आणि गोट्या खेळून आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे नेते संजय बालगुडे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक वर्षी पुणेकर नागरिकांना पावसाळ्यात खड्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप कडून कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना केल्या जात नाही. ही निषेधार्थ बाब असून आम्ही अनेक वेळा आजवर आंदोलन केले आहे. मात्र महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने दखल घेतली गेली नाही. आता आम्ही भाजपचे शहराचे खासदार गिरीश बापट आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना चष्मा भेट देणार आहोत. त्यामधून शहरातील रस्ते पाहावे, असे आवाहन करणार आहोत, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या नेत्यावर निशाणा साधला.

अधिक वाचा  पेट्रोल 75 तर डिझेल 68 रुपये लीटर? GST meeting: अच्छे दिन येणार ?

आंदोलन ठिकाणावरील रस्त्याचे खड्डे बुजवले, काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या धास्तीने भाजपने बुजवले खड्डे

काँग्रेस पक्षाकडून टिळक रोडवर आज सकाळी खड्यांच्या प्रश्नावर विट्टी दांडू आणि गोट्या खेळून आंदोलन केले जाणार असा मेसेज काल पासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या आंदोलनाची महापालिकेतील सत्ताधारी भाजपने धास्ती घेऊन काँग्रेस पक्षाचे आंदोलन फेल ठरावे. या उद्देशाने रातोरात बहुतांश खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा खड्ड्यात
विट्टी दांडू आणि गोट्या खेळून आंदोलन करावे लागले.