नवी दिल्ली -भारताची अव्वल वेटलिफ्टर व टोकियो ऑलिम्पिकमधील रजतपदक विजेती खेळाडू मीराबाई चानू हिचीदेखील डोपिंग चाचणी होणार असल्याचे संयोजन समितीने जाहीर केले आहे. मीराबाईने भारतासाठी यंदाच्या स्पर्धेत पहिले पदक जिंकले होते.

ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने काही खेळाडूंचे डोपिंग चाचणीचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. ऑलिम्पक स्पर्धा खेळण्यापूर्वी किंवा स्पर्धा सुरू असताना कोणत्याही खेळाडूने उत्तेजक सेवन केले का हे पाहण्यासाठी ही चाचणी घेण्यात येते.

मीराबाई सोमवारीच मायदेशी परतली असून तिच्या घरी जाऊन तिचे रक्‍तातील तसेच सॅम्पल ब नमुने घेतले जाणार आहेत. ज्या खेळाडूंनी पदक जिंकले आहे त्यांची डोपिंग चाचणी करण्यात येत असते. मीराबाईच्या गटात ज्या चीनच्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले होते, तिची आता डोपिंग चाचणी घेण्यात येणार आहे. ती जर या चाचणीत दोषी आढळली तर मीराबाईला सुवर्णपदक मिळू शकते.

अधिक वाचा  असं काय घडलं की मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही?

मीराबाईंने महिलांच्या 49 किलो वजनी गटात रजतपदक जिंकले आहे. मीराबाईला मिळालेल्या रजतपदकाचे सुवर्णपदकात रुपांतर झाले तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरू शकते.