आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावात अचानकपणे अनेक मासे मृत्युमुखी पडल्यानंतर ॲक्टिव्ह फाउंडेशनच्या वतीने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार पाटील यांना निवेदन देण्यात आल्यानंतर निवेदनाची दखल घेऊन पाटबंधारे विभागाच्या मोजणीदार अर्चना कानकिराड यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ॲक्टिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा घेण्यात आला. त्यामध्ये सर्व मृत मासे जमा करून टाकण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या निधीतून तलावाची कामे करण्याची मागणी करण्यात आली असून श्रीकांत लिपणे यांनी या 13 कोटी निधीपैकी वर्ग करण्यात आलेल्या चार कोटी निधीचा त्वरित वापर करण्याची मागणी केली असून याबाबत जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे गट असा उल्लेख, एकनाथ शिंदेंचा नवीन ट्वीट चर्चेत

जांभुळवाडी तलावामध्ये प्रदूषित पाण्याने मासे मृत्यूमुखी पडल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आळा झाल्या होत्या. प्रचंड दुर्गंधी पसरली असतानाही स्थानिक मच्छीमार आणि ॲक्टिव्ह फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी “आपला तलाव, आपली जबाबदारी” या भूमिकेतून कुठल्याही शासकीय यंत्रणेची वाट न पाहता सर्व तलाव परिसर स्वच्छ केला. तलाव परिसरामध्ये अनेक नागरिक जॉगिंग आणि पर्यटनासाठी आपल्या कुटुंबास येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी ॲक्टिव्ह फाउंडेशन ला असल्याने तलाव परिसर दर रविवारी स्वच्छ केला जातो.

जांभूळवाडी तलाव परिसर स्वच्छ करण्याची “ॲक्टिव्ह मोहीम” यापुढेही अशीच अखंडपणे सुरू राहणार आहे. प्रदूषित पाण्यामुळे प्रचंड दुर्गंधी असतानाही मृत माशांची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व स्थानिक मच्छीमार आणि ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांचे शिवसेना युवा नेते श्रीकांत लिपणे यांनी आभार मानले आहेत.

अधिक वाचा  वर्षानुवर्षे मागणी करूनही नदीवर पूल नसल्याने, वाहणारी नदी पार करून केले अंत्यसंस्कार

जांभुळवाडी तलावाचे सुशोभिकरण तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री आदरणीय विजय बापू शिवतारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे साडेतीन किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक, अभ्यासिका, वाचनालय आदी काम युद्धपातळीवर सुरू होते.या सर्व कामासाठी 13.5 कोटी ₹ चा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामधील अजून 4.5 कोटी ₹ चा निधी शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणामुळे पडून आहे. तो वापरून उर्वरित कामे मार्गी लावावे. अश्या विविध मागण्यांचे निवेदन जलसंपदा विभागाचे मुख्य अधीक्षक संजीवजी चोपडे आणि कार्यकारी अभियंता विजयकुमार पाटील यांना दिले.