शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस अनोखा पध्दतीने साजरा करण्यात आला. अतिशय दुर्गम भागातील वीर धरण (भोर) येथील अंध व अपंग कु. चंद्रकला कुडाळकर व तुकाराम जाधव यांना कृत्रिम पाय उपलब्ध करून दिले. तसेच माणुसकीचे दूत व्यासपीठ यांच्या तर्फे दोन्ही कुंटूबाला धान्य किट देण्यात आले.

वीर येथील शिवसेना शाखाप्रमुख गणेश जावळीकर यांच्या संपर्कातून ते कुंटूब शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा चे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व पुणे शहर समन्वयक तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क समन्वयक राजाभाऊ भिलारे यांच्या चर्चेतुन शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी नवभारत विकास फाऊंडेशनशी संपर्क साधुन त्या दोन्ही कुटूंबाला कुत्रिम पाय उपलब्ध करून दिले.

अधिक वाचा  कोणत्याही निवडणुका OBC आरक्षणाशिवाय होऊ नयेत: पटोले

सदर कार्यक्रम प्रसंगी राजाभाऊ भिलारे, गजानन थरकुडे, सारंग सराफ, गणेश जावळीकर, डॉ. सस्ते योगीराज खिलारे, राजु रावडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा थरकुडे हॅस्पिटल येथे करण्यात आला.