नवी दिल्ली:  स्विस बँकेत गुप्तपणे ठेवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची कुठलीही माहिती सरकारकडे उपलब्ध नाही, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या दहा वर्षात स्विस बँकेत किती काळा पैसा जमा झाला? आणि त्यावर सरकारनं काय कारवाई केली? असा प्रश्न सभागृहात विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री चौधरी म्हणाले, “सरकारने स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा परत देशात आणण्यासाठी अनेकदा पावलं उचलली आहेत. पण गेल्या दहा वर्षातील या काळ्या पैशाबाबतचं कुठलही अंदाजपत्रक उपलब्ध नाही.”

अधिक वाचा  ओमिक्रॉनचे 7 रुग्ण; घाबरू नका, काळजी घ्या- महापौर

दरम्यान, लोकसभेत या संदर्भात आणखीन एक प्रश्न विचारण्यात आला. काळा पैसा लपवून ठेवणाऱ्या आणि कर चुकवणाऱ्या किती जणांवर कारवाई झाली किंवा त्यांना अटक करण्यात आली? असा हा प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना अर्थ मंत्रालयानं सांगितलं की, “प्राप्तीकर विभागानं कर चुकवेगिरी करणाऱ्या अशा लोकांवर संबंधित कायद्यांतर्गत योग्य त्या कारवाया केल्या आहेत.”

यामध्ये कर चुकवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर प्राप्तीकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलंय, चौकशा झाल्या आहेत, कर भरण्यास प्रवृत्त करण्यात आलं, करावर दंडही लावण्यात आलाय तसेच व्याज आणि दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच फौजदारी कोर्टात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं लोकसभेत दिली.

अधिक वाचा  तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बिपिन रावत गंभीर; 11 मृत्यू

लोकसभेत अर्थसंकल्पावर आपले मत मांडताना बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर लक्ष वेधून घेतले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी शेतकरी कायद्यावरून ‘यु-टर्न’ घेतला असे वक्तव्य केले होते. त्याचे प्रतिउत्तर देताना खासदार सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारने गेल्या काही काळात घेतलेल्या निर्णयावर कसे ‘यु-टर्न’ घेतलेत हे मांडत सरकारची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबतीतहि काही शंका उपस्थित करून लवकर त्यांचे निरसन करण्याचे सरकारला आवाहन केले आहे.