मुंबई : राज्यात आज 123 कोविडबाधित रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,31,552 वर पोहोचला आहे. नागपूर आणि अकोला मंडळात आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही. आजही ठाणे मंडळात सर्वाधिक 38 तर पुणे मंडळात 19 मृत्यूची नोंद झाली. तर औरंगाबाद 5,कोल्हापूर 30,नाशिक 21 तर लातूर मंडळ 10 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.9 % इतका आहे.


राज्यात आज दिवसभरात 6,843 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,64,922 झाली आहे.राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 94,985 इतकी आहे. आज दिवसभरात 5,212 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,35,029 इतकी आहे.

अधिक वाचा  राज्यसभा निवडणूक; भाजपनं प्रथा मोडली?, काँग्रेस भाजपला करणार विनंती? रजनी पाटील, संजय उपाध्याय रिंगणात

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,68,46,984 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,64,922 (13.37 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,17,362 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,506 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.