पश्चिम महाराष्ट्रातून नगराध्यक्ष, सभापती, उपसभापती, सरपंच, सनदी अधिकारी, डाॅक्टर, वकिल, समाजसेविका, उद्योजिका अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणार्‍या कर्तबगार महिलांना देण्यात येणार्‍या नवराष्ट्र वुमेन अचिव्हर्स अॅवाॅर्ड २०२१ पुरस्कार पुणे शहरातून एकमेव महिला प्रतिनिधी आदर्श नगरसेविका पुरस्कार पुणे मनपाच्या नगरसेविका व शिक्षण समिती सदस्य अल्पनाताई गणेश वरपे यांना देण्यात आला. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोर्‍हे व भाजपा प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात, कृष्णकुमार गोयल ,संपादक नवराष्ट्र व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन अल्पना ताई वरपे यांना सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा  26/ 11 च्या शहीद शूरवीरांना 180 रक्तदानाचे अभिवादन

पुणे महानगरपालिकेत प्रथमच सदस्य होण्याची संधी मिळाल्यानंतर सुरुवातीला या भागातील लोकांच्या कामासाठी आपण न्याय देऊ की नाही याची भीती असताना स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे व प्रशासकीय पद्धतीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे बावधन – कोथरूड या प्रभागांमध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मला उल्लेखनीय काम करण्यास सर्व स्थानिकांचे सहकार्य लाभल्याने हा पुरस्कार मी सर्व स्थानिक नागरिकांना अर्पण करीत असल्याचे पुरस्कारानंतर अल्पना वर यांनी सांगितले. पुणे शहरातील राजकारणामध्ये कोथरूड भागातील पारंपरिक आणि अनुभवी नगरसेवकांचा दबदबा असल्याने त्यांच्या कार्यास साजेशी कामगिरी करण्याच्या मानस मी पहिल्या दिवसापासून केला होता या संकल्पाच्या प्रति अविरत काम करत लोकांच्या कामाला प्रथम प्राधान्य दिल्याने या पुरस्कारासाठी मी पात्र झाल्याचेही नगरसेविका अल्पना ताई वरपे यांनी सांगितले.

अधिक वाचा  परमबीरसिंह चंडीगडमध्ये 'अवतरले '; दोन दिवसांत चौकशीस तयार

यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील म्हणजेच नगराध्यक्ष, सभापती, उपसभापती, सरपंच, सनदी अधिकारी, डाॅक्टर, वकिल, समाजसेविका, उद्योजिका अशा पुरस्कार प्राप्त महिला उपस्थित होत्या.