नागपूर : उपराजधानीत पॉर्न किंवा सेक्स व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ‘गुगल’वर पॉर्न व्हिडिओ सर्च करण्यात नागपूरकरांचा तिसरा क्रमांक लागतो. प्रत्येकांच्याच हातात स्मार्टफोन आल्यामुळे पॉर्न बघणाऱ्यांची संख्या चार पट वाढल्याची माहिती सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.

सेक्स व्हिडिओ आणि अश्‍लील चित्रीफितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पॉर्नसाईट्सवर भेटी देणाऱ्यांच्या संख्येत जवळपास चौपट वाढ झाली आहे. यामध्ये शाळकरी मुले-मुली, तरुणी, महिला, युवा वर्ग आणि वृद्धांचाही समावेश आहे. पॉर्न सर्चिंगचे प्रमाण वाढल्यामुळे नागपूर सायबर पोलिसांनी वॉच ठेवणे सुरू केले आहे. पॉर्नची सर्चिंग किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्यावर आयपीसीच्या १४९, आयटी ॲक्‍टच्या सेक्‍शन ६७ (अ,ब,क) नुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

भारतात चार पाच वर्षांपासून ८५७ पॉर्नसाईटवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही लोकांनी पॉर्न पाहणे थांबवलेले नाही. व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क सर्विस, टोर ब्राऊझर किंवा मिरर साइट अशा पद्धतींचा वापर करून आजही पॉर्न पाहिल्या जाते. अनेकदा पॉर्न साईटच्या नावात थोडासा बदल करून ती साईट पुन्हा इंटरनेटवर उपलब्ध केली जाते. उलट बंदीनंतर पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत भारत सातत्याने वरच्या क्रमांकावर असल्याचे चित्र आहे. २०२० च्या जानेवारी महिन्यातच पॉर्न पाहणाऱ्यांची आकडेवारी पॉर्नहबने प्रकाशित केली होती. त्या आकडेवारीनुसारही, पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर होता, हे विशेष.

अधिक वाचा  अवलियाचा जन्मदिनी भीमसंकल्प! चिन्हरुपी भस्मासुराचा वध!

गुगल प्ले स्टोरवर ॲप्स

अनेक आंबटशौकीनांना अश्‍लील चित्रफिती बघण्याचा मोह आवरत नाही. सेक्स व्हिडिओसाठी गुगल प्ले स्टोरवर अनेक ॲप्स आहेत. अगदी २० ते ४० एमबीपर्यंत क्षमता असलेले ॲप्स उपलब्ध आहेत. अन्य ॲप प्रमाणे पॉर्न व्हिडिओचे ॲप्स डाऊनलोड करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. काही ॲप्स सशुल्क डाऊनलोड केल्या जात आहेत.

वृद्धांनाही मोह आवरेना

पॉर्न वेबसाईटवर सर्फिंग करून आनंद घेण्याचा मोह वृद्धांनाही आवरता आला नाही. नागपुरात तर अनेक वृद्धांना ‘हसीन महिलाओं से दोस्ती करो सिर्फ हजार रुपए में’ या माध्यमातून अनेकांना लुटल्याचे समोर आले आहे. तसेच थेट न्यूड कॉल करून व्हिडिओ बनवून काही वृद्धांना खंडणी मागितल्याचे प्रकार समोर आले आहे.

अधिक वाचा  वाचाल तर व्हाल थक्क ; तरुणीचं करायची अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार चक्क

पॉर्न सर्चिंगमध्ये नागपूर तिसरे

गुगलवर पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यात पुणे शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक आहे. तिसऱ्या क्रमांकावर नागपूर शहराचा नंबर लागतो. युवा वर्गासह महिलांनाही पॉर्नचा चस्का लागला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नोकरदार महिलांनीही पॉर्न वेबसाइटवर सर्फिंग केल्याचे समोर आले आहे.

भारतात मॅक आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पॉर्न ॲप बंद असेल तरी इंटरनेटवर Apk (अँड्रॉइड पॅकेजिंग किट) च्या रुपात फाईल्स उपलब्ध असतात. अशा फाईल्स टेलिग्राम व्हॉट्सॲच्या माध्यमातून प्रसारित होत असतात. अशा फाईलद्वारे ॲप डाऊनलोड केल्यावर हे ॲप सिस्टमसाठी धोकादायक आहेत. अश्‍लील चित्रफिती किंवा फोटो डाऊनलोड करणे किंवा मोबाईलमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. असे कृत्य केल्यास ५ वर्षे तुरुंगवास आणि १० लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
                               – केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

अधिक वाचा  ठाकरे सरकारच्या सत्तेतील 2 वर्षांत भाजपा ने काय केले अन काय मिळवलं?

वर्ष                 पॉर्नोग्राफी गुन्हे

२०१९                     ३१

२०२०                     २१

२०२१                      १८ (जुलैपर्यंत)