खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे पाणीसाठ्यात कमालीची वाढ होत आहे. मागील 24 तासांत या चार धरणांत मिळून तीन टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पात 19.39 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

नदीकाठ परिसरात सावधानतेचा इशारा

शहरात पावसाचा जोर वाढू लागल्याने महापालिके च्या मुख्य भवनातील आपत्ती व्यवस्थापन विभाग चोवीस तास कार्यान्वित करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅ मेऱ्यांच्या माध्यमातून आपत्तीजन्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत असून आपत्ती व्यवस्थापन केंद्रांमध्ये सेवकांची २४ तासांसाठी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठी असलेल्या इमारती, वसाहतींना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना नजीकच्या मदत के ंद्रांवर स्थलांतरित करण्याचे नियोजनही महापालिके ने के ले आहे.

अधिक वाचा  आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात.

शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंधरा महापालिका सहायक आयुक्त कार्यालयात स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आवश्यक यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून खाते प्रमुख, अग्निशमन विभाग, पोलीस, हवामान खाते आणि जलसंपदा विभागाशी समन्वय ठेवण्याची सूचना कक्षाला करण्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

दरम्यान, नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठालगतच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा महापालिके ने दिला आहे. नदी आणि नाल्यालगत पूररेषेत असलेली घरे, झोपडय़ा काढून टाकाव्यात. विजेच्या खांबापासून आणि तुटलेल्या विद्युत तारांपासून लांब राहावे. पूरपरिस्थितीत मदत लागल्यास अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा किंवा महापालिकेच्या पूरनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिके कडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा  इतिहासातील सर्वांत मोठी 41 टक्के वाढ; विलीनीकरणावर कर्मचारी ठाम

– आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक – 

पूरनियंत्रण कक्ष- ०२०- २५५०६८००/१/२/३/४ (२४ तास)

अग्निशमन दल- १०१  सुरक्षा रक्षक दल- ०२०-२५५०११३३  पोलीस- १००

शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 400 मिमी पाऊस हा टेमघर धरण परिसरात झाला. तर, वरसगावमध्ये 288, पानशेत-288, खडकवासला -55 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे.

धरणाचे नाव                  पाणीसाठा            (टक्के)
खडकवासला                 1.97 टीएमसी       100
पानशेत                       7.69 टीएमसी        72.24
वरसगाव                      7.87 टीएमसी        61.40
टेमघर                         1.86 टीएमसी        50

अधिक वाचा  सातारा जिल्हा बँक दिग्गजांना धक्का; आमदार शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई यांचा पराभव

मुठा नदीत गुरुवारपर्यंत 0.67 टीएमसी विसर्ग

खडकवासला धरणाची एकूण क्षमता 1.97 टीएमसी इतकी आहे. तसेच खडकवासला धरणाच्या वरील बाजूस तीन धरणे आहे. ही धरणे भरल्यास त्यामधून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणातच जमा होते.

तीन धरणांतून सोडण्यात येणारे पाणी तसेच खडकवासला धरणात जमा होणारे पाणी या सर्वांचा विचार करून पाणीसाठा नियंत्रित करण्यात येतो. गुरुवारी खडकवासला धरण 70 टक्के भरल्यानंतर त्यामधून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत 0.67 टीएमसी इतके पाणी सोडण्यात येत आहे.