पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या दुचाकी व कारचालकांसाठी आता चांगली बातमी आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणाला आज मान्यता दिली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक कार विकत घेणाऱयाला दीड लाख रुपयांची तर ई स्कूटर-बाईकच्या खरेदीवर दहा हजार रुपयांची सूट मिळणार आहे. मात्र सुरुवातीलाच बुपिंग करणाऱयांना ही ऑफर मिळेल.

राज्य सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण आखले होते. आता राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021’ हे राबवण्यास शासन निर्णयाद्वारे आजपासून मान्यता दिली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत हे धोरण राबवण्यात येईल. त्यात बॅटरीवर धावणाऱया दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीवर प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय झाला आहे. महागडय़ा इंधनावर पर्याय व वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी हे धोरण आखले आहे. बॅटरीवर धावणाऱया वाहनांसाठी कोणत्या योजना, चार्जिंग स्टेशनची संख्याही निश्चित केली आहे.

अधिक वाचा  शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे पवार साहेबांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर भेट

चार्जिंग स्टेशनचे प्रमाण

सार्वजनिक व निम सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे प्रमाणही निश्चित केले आहे. प्रत्येक तीन किमी क्षेत्रात किमान एक चार्जिंग स्टेशन.

महामार्गावर प्रत्येक 25 किमीवर चार्जिंग

येत्या 2025 पर्यंत राज्यातील चार प्रमुख महामार्ग व एक्प्रेस – वे हे पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी सज्ज असतील . महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक 25 किमी अंतरावर सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील .

– इलेक्ट्रिक वाहनांसाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतल़ा आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या संदर्भात बैठक आयोजित केली. त्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सध्या वाहन खरेदीमध्ये असलेल्या आर्थिक तरतुदीची मर्यादा लक्षात घेऊन त्यात बदल करण्याची सूचना केली होती.

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

या महामार्गावर चार्जिंग सुविधा

– समृद्धी महामार्ग                     – मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग

– मुंबई नाशिक महामार्ग              – नाशिक-पुणे महामार्ग

चार्जिंग स्टेशनची संख्या    (एकूण 2 हजार 375)

मुंबई शहर व परिसर 1500                पुणे शहर 500

नागपूर शहर 150                           नाशिक शहर 100

संभाजीनगर शहर 75              अमरावती 30              सोलापूर 20

– दहा लाख लोकसंख्येमागे 50 चार्जिंग स्टेशन किंवा यापैकी जे जास्त असेल त्याप्रमाणे चार्जिंग स्टेशनची उभारणी होईल .

अधिक वाचा  'पुष्कर' प्रकल्प नाते विश्वासाचे.. हे ब्रीदवाक्य सार्थकी लावेल; आ. पाटील

दीड लाखाने मोटारीची किंमत कमी

इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. पहिल्या एक लाख ई-स्कूटर्सना दहा हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. तर पहिल्या दहा हजार ई-कारसाठी दीड लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल.

ई – वाहनांची प्रोत्साहनपर रक्कम

दुचाकी – 10 हजार रु.

तीनचाकी ऑटो-  30 हजार रु.

तीनचाकी मालवाहतूक-  30 हजार रु.

चारचाकी कार – दीड लाख रु.

मालवाहतूक वाहन-  एक लाख रु.

ई-बसेस-   20 लाख रु.

ही योजना पर्यावरणपूरक आहे. शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यात या योजनेमुळे मदत होईल. राज्यात यापुढील काळात या योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यास आमचा सदैव विभाग प्रयत्नशील राहील.

– मनीषा पाटणकर – म्हैसकर

प्रधान सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग