पुणे महापालिकेच्या वतीने बावधन भागातील पावसाळी पाण्याचा व्यवस्थित निचारा होण्यासाठी रेन वॉटर लाईन टाकताना व अकार्यक्षम नगरसेवकांनी आणि दुर्लक्ष केल्यामुळे आज बावधन भागातील नागरिकांना पावसाच्या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून भारतीय जनता पार्टीतील नगरसेवक आजही “वाटपा” मध्ये आपल्या कार्याची समाप्ती मानत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

बावधन भागातील मेघ मल्हार रागा ते रिद्धी सिद्धि दरम्यान चा विकास आराखड्यातील डीपी रस्ता असतानाही या भागातील पदपथांची व रस्त्याचे सिमेंट करण्याची कामे करताना प्रसिद्धी लाच महत्त्व देणाऱ्या नगरसेवकांनी या भागातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्थापन न केल्यास या भागातील लोकांना पाण्याच्या तळ्यातून आपला मार्ग शोधावा लागत आहे एलएमडी चौक या उंचवट्याच्या रस्त्यावरही पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्याने स्थानिकांच्या घरात पाणी घुसण्याची भीती वाटत आहे.

अधिक वाचा  सरु आजीने डॉक्टराला दिली धमकी -‘देवमाणूस2'

बावधन भागाची रचना राम नदीच्या लगत तीव्र उताराचे असतानाही केवळ अकार्यक्षम नगरसेवकांचे नियोजनामुळे या तीव्र उताराच्या भागात ही स्थानिक नागरिकांना नियमितपणे पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत असून यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. बावधन नियमितपणे रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा होत असून आज पाणी दुकानात येत आहे. या समस्येतून कायमस्वरूपी तोडगा आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी यांच्या अकार्यक्षमपणा आणि ढिसाळ नियोजन मुळे बावधनमध्ये पहिल्याच पावसात जागो जागी पाणी साठत आहे.

बावधन मधील लोकप्रतिनिधी यांनी 4 वर्षापूर्वी बावधनकरांना सर्व सोयीसुविधांनी युक्त रस्ते जलतरण तलाव अशा असंख्य सोयी सुविधा देण्याचे वचन दिले परंतु प्रत्यक्षात मात्र लोकप्रतिनिधींच्या आकार्यक्षमतेमुळे परिसरात जागोजागी पाण्याची तळी म्हणजेच हेच का ते जलतरण तलाव का असा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

बहुजन भागातील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लवकरच निवेदन दिले जाणार असून या समस्येतून बावधनकरांची सुटका न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कुणाल वेडेपाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासला यांनी दिला आहे.