मुंबई – बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही गेल्या काही दिवसांपासून आपला पती राज कुंद्रामुळे अडचणीत सापडली होती. आता ती मोठ्या संकटात सापडली आहे. त्याचे कारण म्हणजे आज मुंबई क्राईम ब्रँचनं तिच्या घरावर छापा टाकला आहे. या घटनेनं बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या पतीलाही क्राईम ब्रँचनं पोर्नोग्राफी व्हिडिओ निर्मिती आणि ते शेयर करणं यामुळे अटक केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.


छापेमारीला जाताना पोलिसांनी राजलाही बरोबर नेल्याची माहिती आहे. पोलिसांनी राज आणि त्याच्या आणखी एका सहकाऱ्याला अटक केली. आणि त्यांना जेव्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा पोलिसांनी आपली बाजु मांडली. आपल्याकडील पुरावेही सादर केले. बचावपक्षी राजनं आपण ते एका विशिष्ट वर्गासाठी ते व्हिडिओ तयार केले होते. मात्र ते पॉर्न नाहीत. असे मत त्यानं व्यक्त केले आहे. राजनं उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते आहे.

अधिक वाचा  पेट्रोल 75 तर डिझेल 68 रुपये लीटर? GST meeting: अच्छे दिन येणार ?

यापूर्वी राजवर शर्लिन चोप्रा, पुनम पांडे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रातील प्रसिध्द अभिनेत्री निशा रावलनं शिल्पाची बाजू घेतली होती. यासगळ्या प्रकरणात कदाचित राज दोषी असेलही. तसे झाल्यास त्याला शिक्षा व्हावी. मात्र शिल्पाला सगळेजण का नावं ठेवत आहेत. असा प्रश्न तिनं यावेळी उपस्थित केला होता. अनेकांनी राजच्या या प्रकरणात शिल्पाचं नाव घेतल्यानं तिनं नाराजी व्यक्त केली. तिनं आज पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली प्रतिक्रियाही दिली.

शिल्पा आपल्या प्रतिक्रियेत म्हणते, सध्या आपण एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. दुसरीकडे पोलिसांनी छापेमारीतून एक गोष्ट समोर आणलीय. ती म्हणजे राजचे बँक खाते तपासले जाणार आहेत.