भाजपाचे महापौर आणि नगरसेवक यांच्या वार्डस्तरीय विकास निधीतून पुणे महानगरपालिकेचे निधीतून कोथरूडमध्ये उभारण्यात आलेल्या जनसंवाद कट्टा, जेष्ठ नागरिक कट्टा, वाचनालय, यांच्यावर कुठेही महानगरपालिके चा लोगो न लावता आपल्या पक्षश्रेष्ठीं व नेत्यांचे फोटो लावून पोस्टर बॉईज कट्टे निर्माण केले होते. राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने केदार मारणे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना ३०जुन आणि १३ जुलै रोजी निवेदन देण्यात आले होते आणि संबंधित वास्तूवर पुणे महानगरपालिकेचा लोगो आणि नाव टाकावे अशी मागणी करण्यात आली होती.

पुणे महापालिकेच्या वतीने संबंधित पोस्टर बॉईज वरती कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोगो  आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहर अध्यक्ष विजय उर्फ बापू डाकले, राजाभाऊ गायकवाड, गजानन कड, धनराज बंनपट्टे, संजय औजी, दादा आठवले, मंगेश नवघणे, सागर शिगवण, संदीप शितोळे, शांताराम तावरे, सचिन डाकले उपस्थित होते. आंदोलनाचे आयोजन केदार मारणे यांनी केले होते.

अधिक वाचा  omicron Virus ची 23 देशांत धडक, WHO चा गंभीर इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनाचा विचार पुणे महानगरपालिकेने केला नाही. सामान्य पुणेकरांचे करातून या विकास कामांसाठी निधी मिळत असतानाही पुणे महापालिकेच्या प्रशासकीय स्तरावरून याची दखल घेतली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वास्तूंवर स्वखर्चातून पुणे महानगरपालिका लोगो, पुणे महानगरपालिकेचे नाव लावण्यात आले. यापुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्राहक संरक्षण समिती मार्फत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनातून ही रक्कम वजा करण्याची मागणी करण्यात येणार असून यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे पदाधिकारी केदार मारणे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने वर्तमानपत्रांमध्ये काही जाहिराती देण्यात आल्या होत्या त्यामध्ये असे लिहिले होते छत्रपती का आशीर्वाद…. दे दो मोदीजी को साथ! पण भाजपच्या नगरसेवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला महानगरपालिकेच्या लोगो चा विसर पडला आहे तसेच भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी काही दिवसांपूर्वी प्रशांतदादा जगताप यांच्या विषयी भाष्य केले होते राष्ट्रवादीचे कोथरूड मध्ये अस्तित्व नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणून मारणे म्हणाले भाजपाला कोथरूडमध्ये अस्तित्व दाखवण्यासाठी पालिकेच्या निधीतून अशा प्रकारचे कट्टे उभे करून त्याच्या स्वतःच्या नेत्यांचे आणि स्वतःचे फोटो टाकून अस्तित्व दाखवायला लागत आहे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून चारी मुंड्या चित झालेल्या मुळीक यांनी वडगाव शेरी मधील स्वतःचे अस्तित्व बघावे आणि मग पुण्याबद्दल बोलावे असे आवाहन केदार मारणे यांनी केले आहे.