मुंबई: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. राजला अटक झाल्यापासून त्याच्याविरोधात अनेक नवोदीत मॉडेल्स आणि अभिनेत्री यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. काहींनी अर्थिक फसवणूकीचे तर काहींनी चित्रपटांच्या नावाखाली फसवल्याचे. परंतु या सर्व प्रकरणावर आता पहिल्यांदाच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या पतीची बाजू घेत भविष्यातील सर्व संकटांचा आम्ही मिळून सामना करू असं ती म्हणाली आहे.

शिल्पा शेट्टी पाहूया नेमकं काय म्हणाली?

शिल्पाने अमेरिकन लेखक जेम्स हर्बर यांच्या एका पुस्तकातील मजकूर इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. या मजकुराच्या माध्यमातून तिने पतीच्या अटकेवर भाष्य केलं. “संकट जेव्हा येतात तेव्हा ती चहुबाजूंनी येतात. पण आपण त्यांना धैर्याने सामोरं जायला हवं. आपण घाबरलो, बिथरलो तर त्याचा आपल्यालाच अधिक त्रास होतो. आपण नैराश्येत जातो. अन् नको त्या चूका करू लागतो. परंत आम्ही या संकटांचा सामना करणार आहोत. आम्ही एकत्र मिळून या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडू.”  अशा आशयाचा हा मजकूर आहे.

अधिक वाचा  न्यूझीलंडचा पहिला डाव 62 धावांतच आटोपला; फिरकीसमोर घसरगुंडी

राज कुंद्रा विरोधात सापडला मोठा पुरावा

क्राईम ब्रांचनं उमेशच्या ऑफिसवर छापा मारला. यामध्ये तब्बल 70 अश्लील व्हिडीओ त्यांच्या हाती लागले आहेत. हे व्हिडीओ विविध प्रोडक्शन हाऊसने त्यांना पाठवले होते. राज कुंद्रा आणि उमेश कामत हॉटशॉट नावाचा एक वेब सीरिज अॅप चालवत होते. यावर आतापर्यंत 90 व्हिडीओज शेअर करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 30 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील दृश्य आहेत. अर्थात हे पॉर्न व्हिडीओ नाहीत असा दावा वारंवार राज कुंद्रा करत आहे. चौकशीदरम्यान युकेमधील केनरिन कंपनीसोबत त्याचे व्यवसायिक संबंध असल्याचं त्याने मान्य केलं. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पॉर्न व्हिडीओंची निर्मिती केलेली नाही असं तो वारंवार सांगतोय. तो केवळ एरॉटिक बोल्ड सीरिजची निर्मिती करत होता असा त्याचा दावा आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.