पुणे : राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून अतिवृष्टीमुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गेल्या 24 तासांपासून भिमाशंकर परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून पाणी मंदिरात आलं आहे.

मंदिराच्या बाजुच्या डोंगरातून पुराच्या पाण्याचा लोट येत असल्यामुळे मंदिरात पाणी जमा झालं आहे. पुणे भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली गेलं आहे.

अधिक वाचा  ओमिक्रॉनचे 7 रुग्ण; घाबरू नका, काळजी घ्या- महापौर

मुसळधार पावसामुळे कोकणात हाहाकार माजला आहे. दरम्यान येथील अनेक गावांसोबतचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान महाड येथून दरड कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये तब्बल 32 घरांवर दरड कोसळली आहे. यामध्ये तब्बल 75 जणं बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

महाड तालुका बिरवाडी पासून 14 किलोमीटरवर तळीये या गावी गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सुमारे 32 घरे गाडली गेली असून 72 लोक बेपत्ता आहेत. तळीयेच्या सरपंचांनी याबाबत माहिती दिली. या ठिकाणी NDRF ची मदत पाठविण्यात आली आहे. मात्र पावसाचा वेग कायम असल्याने मदतकार्य धीम्या गतीने सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.