महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष मा. जगदीशजी मुळीक साहेब, पुणे शहर भाजपाचे संघटन सरचिटणीस मा. राजेशजी पांडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला.

वृक्षारोपण अभियाना अंतर्गत संपूर्ण प्रभागामध्ये 500 वृक्ष लावण्यात आले या वृक्षारोपनामध्ये रोटरी क्लब, ग्रीन क्राऊन बावधन या संस्था तसेच परिसरातील विविध सोसायट्यांचे चेअरमन व नागरिक मोठय्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रभागतील 500 घरेलू कामगार महिलाना शिधा वाटप करण्यात आले व 500 रिक्षा चालकांसाठी कोरोंना पासून सुरक्षित राहून व्यवसाय सुरळीत करण्यात यावा यासाठी 500 रिक्षा धारकांना पडदे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा  कितीही जोडा,तोडा महापौर मनसेचाच, वसंत मोरेंचा दावा

मा. जगदीशजी मुळीक म्हणाले की, प्रभाग क्रा. 10 मध्ये नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी आजतागायत 3000 हजार पेक्षा अधिक वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले आहे तसेच दिलीप वेडेपाटील यांच्या पुढाकाराने बावधन परिसरात भव्य असे नागरी वन उद्यान साकारण्यात येत असल्याची माहिती जगदीश मुळीक यांनी यावेळी.

पुणे मनपा मधील प्रशासनाच्या मागे लागून, काम संपूर्णपणे मार्गी लागेपर्यंत पाठपुरवठा करून काम करून घेण्याची पद्धत असणार्याच नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या मार्फत आज बावधन येथील एल.एम.डी. चौकामध्ये भव्यदिव्य अशी शाळा बांधण्यात येत असल्याची माहिती संघटन सरचिटनीस मा. राजेशजी पांडे यांनी यावेळी दिली.

अधिक वाचा  विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी अंबादास दानवे यांची नियुक्ती

वृक्षारोपण अभियान संपूर्ण प्रभागामध्ये 500 वृक्ष लावण्यात आले या वृक्षारोपनामध्ये रोटरी क्लब, ग्रीन क्राऊन बावधन या संस्था तसेच परिसरातील विविध सोसायट्यांचे चेअरमन व नागरिक मोठय्या संख्येने उपस्थित होते व या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी मा. श्रीपादजी ढेकणे, नगरसेवक मा. दीपकजी पोटे, नगरसेवक मा. राजेशजी येणपुरे, स्वीकृत सदस्य मा. बाळासाहेब टेमकर, कुलदीप सावडेकर,राजेश मनगिरे, धनंजय दगडे,बंडू भंडारी, ह.भ,प. शंकर वेडेपाटील, प्रभाकर करंजावने, ह.भ.प. कान्हू वेडेपाटील, नितिन दगडे, पवन सतदेवे, प्रसाद वेडेपाटील, केतन वेडेपाटील, निधि भाटीया, जिगीषा भरुचा, कल्याणी कलावंत आदि मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन स्वीकृत सदस्य मा. वैभव मुरकुटे यांनी केले व आभार शैलेश वेडेपाटील यांनी मानले.