पुणे : शहर विकासाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रित केले आहे. राज ठाकरे यांच्या या महिनाअखेरीस होणाऱ्या पुणे दौऱ्यात ही चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापालिके च्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याचा समारोप बुधवारी झाला. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या शेकरू प्रजनन के ंद्र आणि रान मांजर के ंद्राचे उद्घाटन बुधवारी राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, बाबू वागसकर यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान, सर्पमित्र नीलमकु मार खैरे यांनी उद्यानात राज ठाकरे यांची भेट घेतली.

अधिक वाचा  गल्ली ते दिल्ली राजकारण्यांनी केलेली भ्रष्ट व्यवस्था पारदर्शक करण्याचे काम आम आदमी करणार - कृष्णा गायकवाड

राज ठाकरे यांचा पुढचा दौरा महिनाअखेरीस होणार आहे, असे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सांगितले. ३० जुलै, १ ऑगस्ट या कालावधीत हा दौरा होणार आहे. यावेळी शहर विकासाच्या प्रश्नावर राज ठाकरे या दौऱ्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. तसे निमंत्रणही राज ठाकरे यांनी महापौरांना दिल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, तीन दिवसांच्या दौऱ्यात राज ठाकरे यांनी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्ष संघटन बळकट करण्यासंदर्भात त्यांनी पदाधिकारी, माजी नगरसेवकांबरोबर चर्चा केली.