पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स जागोजागी लागले आहेत. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असणाऱ्या लोकांनीही अजित पवारांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावले आहेत.

याबाबत विचारलं असता अजित पवार पत्रकारांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं. गुन्हेगारांना मी होर्डिंग्स लावायला सांगितल्या होत्या का? असा उलट सवाल त्यांनी केला. त्यावर आता भाजपने अजित पवार यांना प्रत्यु्त्तर दिलं आहे. महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसनंच काढायला हवे, असं भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हटलंय.

अधिक वाचा  संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; धक्कादायक निर्णय

अजित पवारांचे गुन्हेगारांसोबत जे होर्डिंग्स लागले आहेत ते काढण्याची जबाबदारीही राष्ट्रवादीचीच आहे. त्यामुळे ते होर्डिंग्स त्यांनीच काढावेत. महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग्स काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही. ते राष्ट्रवादीने काढले पाहिजेत असं मुळीक म्हणाले.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपनं लावलेल्या होर्डिंग्सवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यावर मुळीक यांनी मिटकरींनाही प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल मिटकरी यांची देवेंद्र फढणवीस यांच्यावर बोलण्याची योग्यता नाही. देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे आणि राज्याचे विकासपुरुष आहेत. मिटकरी यांच्या पक्षाचे जे होर्डिंग लागले आहेत त्यावर किती गुन्हेगार आहेत हे आधी त्यांनी तपासावं, असं उत्तर मुळीक यांनी दिलं आहे.

अधिक वाचा  कर्नाटकात ओमिक्रॉन : 2 आठवडे भारताला महत्त्वाचे- आरोग्य तज्ज्ञ

होर्डिंग्सबाबत अजित पवार काय म्हणाले?

पिंपरी-चिंचवडमध्ये मी आज येत नाही महाराज, मी अनेक वर्षांपासून येतो. पिंपरी चिंचडवकरांना माझी सर्व मते स्पष्टपणे माहीत आहेत. तुम्ही काही तरी नवी गोष्ट काढण्यासाठी कोणता तरी मुद्दा सोडायचा आणि प्रश्न विचारायचे हे धंदे बंद करा, असा दम भरतानाच अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं नाही. एक मिनिट… मी नियमांचं पालन करणारा माणूस आहे.

होर्डिंग चुकीची लागले असेल तर भाजपची सत्ता आहे. आयुक्त महापौरांनी किंवा शहराचं कामकाज ज्यांच्या हातात आहे, त्यांनी त्यावर कारवाई करावी, असं अजितदादा म्हणाले.