भारतीय जनता पार्टीचा सुशिक्षित,सुसंस्कृत व अभ्यासु नेता.स्व.प्रमोदजी महाजन व स्व.गोपिनाथजी मुंडे साहेब यांच्या नंतर स्वकर्तुत्वावर तयार झालेलं एक खंबीर नेतृत्व देवेंद्र फडवणीस..

सन२०१४ व सन२०१९च्या दोन्ही विधानसभा निवडणूका या त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाने शिवसेना व अन्य पक्षांसोबत घेऊन महायुतीच्या माध्यमातून लढविल्या.दोन्ही निवडणूकीत शंभरच्या वर जागा जिंकून मा.देवेंद्रजींनी आपल्या वरील पक्षश्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवला.सन २०१४ मध्ये मा.देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीची पूर्ण बहुमताने सत्ता आली व ते मुख्यमंत्री झाले.व्यापार,उद्योग,शेती व सिंचन सुविधा,आरोग्य या बाबतीत अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले.

राज्यातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदारी सक्षम व्हावी, साखर विक्री हमीभाव, इथेनॉल तसेच दुथ उतपादक शेतकरी यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केले. कर्जमाफी,जलयुक्त शिवार व शेतकरी वर्गासाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, या सारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली.तसेच शहरी भागात देखील अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या.त्याच बळावर २०१९साली विधानसभा निवडणूकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा महायुतीची सत्ता आली होती.महाराष्ट्रातील जनता जनार्दनाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आपल्या मताचे दान हे महायुतीच्या पारड्यात टाकले होते.परंतु, मित्र पक्षाने साथ सोडून दुसऱ्या पक्षा बरोबर जाऊन घरोबा करून सत्ता स्थापन केली.
आज मा.देवेंद्रजी हे सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून आपली जबाबदारी पार पाडीत आहेत.त्यांच्या विषयी लिहीण्यासारखे बरेच काही पैलू आहेत.असो.मा.देवेंद्रजींच्या कार्यकर्तुत्वाला माझा सलाम. सामन्य कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे, कि महाराष्ट्रातील जनतेचा जनाधार असलेला हा लोकनेता पुन्हा स्वबळावर मुख्यमंत्री होणार..

अधिक वाचा  समुद्रपातळीत तिप्पट वाढ; या देशाचे अस्तित्वच धोक्यात; पाण्यातूनच जगाला आवाहन

गणेश शंकरराव आखाडे पाटील
समन्वयक ” पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा