अजित अनंतराव पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे अजितदादा. साध्या कार्यकर्त्यांपासून सगळे त्यांना याच नावाने हाक मारतात. स्ट्रेट फॉरवर्ड, रोखठोक आणि प्रशासनावर पकड, कोणत्याही विषयाचे सखोल अभ्यास अशा गुणांमुळे त्यांचे हे दादापण शांतपणे, गर्व न करता निभावण्यामुळेच..!अजितपर्व

राजकारण हा तर पुण्याचा श्वास आहे, तो अगदी शिवकाळापासून नेतृत्व करणे ही पुण्याची सवय आहे. पुण्यातून थेट दिल्लीचा कारभार केला जात होता. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वही पुण्याकडेच होते. मुळात स्वातंत्र्याची हाकच पुण्यातून देण्यात आली. लोकमान्य टिळक होते तोपर्यंत स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू पुण्यातच होता. त्यानंतर मात्र त्याकडे थोडे दुर्लक्ष झाले. मात्र राजकारणातील नवा विचार पुण्यातच मांडला जात असतो. महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा आग्रह धरण्याआधी विदेशी कापडांची पहिली होळी (सन 1907 ऑक्टोबर) पुण्यात झाली होती. होमरूल चळवळीची पहिली घोषणाही पुण्यातच झाली होती. आजही या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. नवनवे राजकारणी ते सिद्ध करून दाखवत असतात. देशाच्या राजकीय नकाशावर पुण्याचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी राजकारणातील अनेक दिग्गज कार्यरत आहेत.त्यामुळे राजकारण त्याला अपवाद नाही.

अधिक वाचा  पराग अग्रवाल ट्विटरचे नवे CEO ; एकमताने निवड जॅक डोर्सी पायउतार

विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याची ख्याती आहे. त्यामुळे आसपासच्या गावांमधूनच नव्हे तर दुसऱ्या शहरांमधून शिक्षणासाठी म्हणून अनेक विद्यार्थी पुण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या विविध चळवळी या विद्यार्थ्यांनी सुरू केल्या. त्यातून त्यांचे राजकीय नेतृत्व बहरु लागले. देशाच्या राजकारणात प्रभाव टाकणारे शरद पवार हेही यातूनच पुढे आले आहेत. तेच काय पण विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे वेगवेगळ्या पक्षातील नेते शिक्षणासाठी पुण्यात आले.इथे त्यांनी अनेक चळवळी सुरू केल्या. त्यात ते नेतृत्व करत होते. शिक्षण संपल्यावर ते गावी गेले व थेट नेतेच झाले. ग्रामीण भागात आज प्रस्थापित झालेले व देशाच्या, राज्याच्या राजकारणात प्रभाव टाकणारी म्हणून प्रसिद्ध असणारे असे अनेक जण पुण्यातूनच पुढे आले आहेत. उद्याच्या राजकारणाची आशा म्हणावेत असे अनेकजण पुण्याच्या राजकारणात आज दिसत आहेत. त्यात काही घराण्याचा वारसा चालवणारे राजकारणी आहेत, तर काही स्वबळावर निवडून येऊन राजकीय साम्राज्य करणारेही आहेत. सद्यस्थितीमध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा असे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजित अनंतराव पवार.

अधिक वाचा  'स्वारद' फाऊंडेशन तर्फे भव्य किर्तन महोत्सव; मान्यवरांची सुश्राव्य कीर्तने

राष्ट्रवादी पक्षाचे शक्तिस्थळ असलेल्या अजितदादांना विरोधकांनी आणि प्रसिद्धी माध्यमांनी नेहमीच त्यांच्या रडारवर अग्रस्थान दिले आहे. अशा परिस्थितीत अजितदादांबद्दल संभ्रम निर्माण होणे सहाजिकच आहे. म्हणून अजितदादांनी विविध सहकारी, शैक्षणिक संस्था, नगर विकासाच्या संस्था, खेळाच्या संस्था किंवा त्यांच्याकडे आलेल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत प्रशासकीय विभागचे काम करताना आपल्या अलौकिक दूरदृष्टीतून जो अतुलनीय विकास साध्य केला त्याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. ज्या संस्थांना आणि प्रशासकीय विभागांना दादांचा परिसस्पर्श झाला आहे. त्यांनी विकासाचे नवे नवे उच्चांक साध्य केले आहेत. आणि म्हणून राज्याच्या सर्वोच्च पदी बसण्याची संधी जर दादांना मिळाली तर महाराष्ट्राच्या इतिहासातील दिव्यदृष्टी लाभलेल्या मुख्यमंत्रीपदाची खंडीत झालेली परंपरा पुन्हा एकदा सुरू होण्याची नांदी ठरेल.

आज विरोधकांकडे राज्यव्यापी, व्यासंगी, निरोगी व उमदे व्यक्तिमत्वच नाही.याउलट विकासाची जाण असलेल्या राष्ट्रवादीकडे एक उमदं नेतृत्व आहे. सकाळी 7 पासून दररोज सोळा-सतरा तास काम करण्याची क्षमता,विषयाचे सखोल ज्ञान, अचूक आणि पटापट निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर नियंत्रण, विकासाची असामान्य दृष्टी यामुळे दादाच आजच्या घडीला राज्याच्या सर्वोच्च पदासाठी सर्वोत्तम पर्याय आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक व मानवी सुख साधनांनी समृद्ध राज्य आहे. या संसाधनांचा राज्याच्या महत्तम विकासासाठी अचूक वापर व्हावा यासाठी राज्याच्या सर्वोच्चपदी विराजमान हवी असते एक विलक्षण दूरदृष्टी असलेले नेतृत्व. आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण,स्व. वसंतदादा पाटील, स्व. वसंतराव नाईक आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दिव्य दृष्टितुन महाराष्ट्राने विकासाचा मोठा पल्ला गाठला होता. राज्याच्या सर्वोच्च स्थानी शक्तिशाली नेतृत्व असेल तर त्याचा लाभ पूर्ण राज्याला मिळतो. आजच्या घडीला कल्पक व दिव्यदृष्टी, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक असलेली प्रशासकीय हातोटी आणि अडचणीच्या काळात राज्याला खंबीरपणे पुढे नेण्याची वृत्ती हे सर्वोच्च स्थानी नेतृत्व करण्यासाठी असलेले निकष पूर्ण करणारे अजित दादा पवार हेच एकमेव आणि आश्वासक चेहरा दिसतो अशा धाडसी नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अधिक वाचा  करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोदींची बैठक

– महेश टेळेपाटील

संपादक, न्युजमेकर.लाईव्ह