उद्योग व्यवसाय यांचा विस्तार, शिक्षण आणि रोजगार अशा अनेक कारणांसाठी पुण्याकडे अनेकांची पावले होऊ लागली आहेत. अर्थातच त्यामुळे पुण्याला अनेक आव्हानांना ही सामोरे जावं लागत आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्याची कृती आणि विकासाची दूरदृष्टी अजितदादांकडे आहे. पुण्याची वाटचाल परिपूर्ण शहराकडे करण्याचा करण्याचा दादांचा मानस आहे.यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याचा आदर करणे आणि नागरिकांचा विकास प्रक्रियेत सहभाग वाढविण्याची गरज त्यांना वाटते.

ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रांचा समृद्ध वारसा लाभलेले पुणे शहर झपाट्याने वाढत आहे. उद्योग व्यवसाय यांचा विस्तार, शिक्षण आणि रोजगार अशा अनेक कारणांसाठी पुण्याकडे अनेकांची पावले होऊ लागली आहेत. अर्थातच त्यामुळे पुण्याला अनेक आव्हानांना ही सामोरे जावं लागत आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्याची कृती आणि विकासाची दूरदृष्टी अजितदादांकडे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, पुण्याची आजची लोकसंख्या 33 लाखांवर गेली असून,2044 पर्यंत ती 90 लाखांच्या घरात जाईल असा अंदाज आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याच्या मूलभूत सुविधा आणि विकासावर ताण आला आहे. तो दूर करण्यासाठी कार्यक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक शहर व्यवस्थापनाची निकड दादांना वाटते. नागरी सुविधांमध्ये अमुलाग्र सुधारणा, सुनियोजित वाहतूक, पर्यावरणाचे जतन, गोरगरिबांसाठी विशेष तरतुदी, व्यापार उद्योगांना चालना, महिला व दुर्बल घटकांचं सक्षमीकरण अशा सूत्रांचा वापर करून पुण्याची वाटचाल परिपूर्ण शहरांकडे करविण्याचा दादांचा मानस आहे. यासाठी तज्ञांच्या सल्ल्याचा आदर करणे आणि नागरिकांचा विकास प्रक्रियेत सहभाग वाढविण्याची गरज त्यांना वाटते.
राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या पक्षाच्या धोरणानुसार, दादांनीही पुण्याच्या समग्र विकासाची दृष्टी बाळगली आहे. त्यांच्याच प्रेरणेतून पुणे शहरातील 110 उद्यानांचा विकास करण्यात आला. टेकड्यांवर संयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात आले. सार्वजनिक वाहतुकीवर भर देत सायकलींसाठी स्वतंत्र लेन्स आणि वाहनतळाच्या उभारणीस चालना देण्यात आली. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्यापासून वीज निर्मितीचे उद्दिष्टही पुणे महापालिकेने साध्य केले. कचरा व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. झोपडपट्टीवासीयांसाठी महानगरपालिकेकडून विविध घरकुल योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. या मागे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याप्रमाणेच अजितदादांची प्रेरणा आणि प्रयत्न कारणीभूत आहेत होते.

अधिक वाचा  जागतिक एड्स दिन २०२१: एड्स आजाराविषयी गैरसमज,इतिहास आणि महत्त्व सविस्तर वाचा

अजितदादांच्या धडाडीच्या आणि तत्पर कार्यशैलीमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात अनेक विकास कामे राबून अमुलाग्र बदल करता आले. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करण्यासाठी दादांचा मोलाचा वाटा आहे. 1999 च्या निवडणुकीमध्ये पुणे पालिकेत राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक होते. त्यानंतर 2002 मध्ये ही संख्या 22 झाली. त्यानंतर 2007 मध्ये ही संख्या 51 वर गेली आणि 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. अर्थातच, या प्रगतीमागे दादांचे बेरजेचे आणि अभ्यासू राजकारणच आहे. 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुणे शहराचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असणार हे वेगळे सांगावयास नको.