राज्यकारभाराचे शकट हाकताना केवळ लोकोपयोगी निर्णय घेऊन चालत नाही तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, अधिकाऱ्यांचे चुकत असेल तर त्यांना प्रसंगी खडे बोल सुनावणे आवश्यक असते. हे तंत्र फार मोजके लोक प्रतिनिधींना जमते. दादांनी आपल्या कारकिर्दीत प्रशासनाला गती दिली, ढिसाळ कारभार करणाऱ्या, जनतेशी सौजन्याने न वागणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन विकासाच्या कामांना चालना दिली. प्रशासनातील त्रुटी दूर करण्यासाठी, कारभारात सुसूत्रता, वेगवानता आणि पारदर्शकपणा येण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत दादा नेहमीच आग्रही राहिली आहेत.

दादा : एक करडा प्रशासक – राजेंद्र सातवपाटील

– अजित दादांना घेण्याचा विरोधकांनी हरप्रकारे प्रयत्न केला ; पण एका बाबतीत मात्र त्यांना विरोधही करता आला नाही. ती गोष्ट म्हणजे प्रशासनावरील दादांची पकड. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडून कशाप्रकारे कामे करून घ्यायची, कासवाच्या गतीने चालणाऱ्या प्रशासनाला गती कशी द्यायची, त्यामध्ये पारदर्शकपणा कसा आणायचा, प्रसंगी त्यांना खडे बोल कसे सोनवायचे याचे उदाहरण दादांनी आपल्या कारकिर्दीत संपूर्ण राज्यासमोर घालून दिले.

अधिक वाचा  अवघ्या चार आणि सात वर्षाच्या चिमुकल्यांनी पार केला मलंग गड

‘ सदस्यांनी एखाद्या कामाबाबत तक्रार केली, तर त्याची दखल घेऊन तपासणी करा. दखल घेतली नाही अशी तुमच्याबद्दल तक्रार आली, तर मी कारवाई करणार. जिल्हा प्रशासनाचे, महापालिकेचे किंवा जिल्हा परिषदेचे कोणतेही विकासकाम असो त्याबद्दल सदस्यांनी तक्रार केल्यास त्याची तपासणी झाली पाहिजे. ही कामे जनतेच्या पैशातून होतात तुम्ही कामात असाल, तर ‘दोन दिवसांनी तपासणी करतो,’ असे सांगा; परंतु तक्रार केली तर उर्मटपणे उत्तरे न देता,त्याची दखल घ्या.सरकार पगार देते, याची जाणीव ठेवा. सदस्यांना उर्मट उत्तरे देऊ नका. तुम्ही सेवक आहात, मालक नाहीत, असे अधिकाऱ्यांना सुनावण्याची धमक एकट्या दादांकडेच आहे. सध्याचे पुढारी लोकांना तोंडावर एक बोलतात आणि माघारी वेगळेच काहीतरी करत असतात. तोंडावरच्या गोड बोलण्यामुळे समोरचा माणूस फसतो आणि बऱ्याच वर्षानंतर आपल्याला फसवले आहे हे त्याच्या लक्षात येते. या वृत्तीमुळे अशा नेत्यावरचा लोकांचा विश्वास उडतो आणि पुन्हा काही करून तो निर्माण करता येत नाही. अजितदादा पवार मात्र अशा नेत्यांच्या मांदियाळीत बसत नाहीत. अजितदादा पवार यांचा परखडपणा हा केवळ बोलण्यापुरताच आहे असेही नाही. त्यांची धोरणे सुद्धा परखड आहेत आणि हाती घेतलेले काम आणि घेतलेला निर्णय ते तेवढ्याच परखडपणे शिवटासही नेत असतात.

अधिक वाचा  IND vs NZ 2ndTEST: ३ खेळाडू ‘आऊट; कोहलीचे संघात पुनरागमन'

महाराष्ट्रामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून पुढे आला आहे. गेल्या काही वर्षापासून पक्षाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार साहेब हे तर केंद्रीय राजकारणात मग्न आहेत. राज्यातल्या छोट्या-मोठ्या घटनांकडे आणि संघटनात्मक बाबींकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी पुढच्या पिढीला कार्यरत केले आहे.राज्याच्या स्पर्धात्मक चढाओढीच्या राजकारणामध्ये अशा लहान – सहान बाबींना महत्त्व असते. अशा बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेते फार पराकोटीचा निर्णय घेण्याचे धाडस दाखवत नाहीत. असे अनेक नेते सगळ्याच बाबतीत शरद पवार साहेब यांच्या कडेच पाहत असतात. परंतु अशा बाबतीत निर्णय घेण्याचे धाडस फक्त अजितदादा पवारच दाखवतात असे आता संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आले आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे खासदार कोल्हेंची कोल्हेकुई? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल

राजकारणातून समाजकारणाच्या संस्कृतीचे धडे अजितदादा यांना घरातूनच गिरवायला मिळाले. केवळ स्वतःच्या किंवा पक्षाच्या हितासाठी राजकारण न करता ते सर्वसामान्यांच्या हितासाठी कसे करता येईल याचे पवार कुटुंबीय हे आदर्श उदाहरण आहे.अजितदादांनीही तोच वारसा पुढे चालवला आहे. अभ्यासूपणा, धाडस, तळमळ आणि परखडपणा यांच्या साह्याने राज्याचा नेता होण्यापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोरून तरळून जातात.