महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणामध्ये असे मोजकेच राजकारणी आहेत ज्यांनी जनमानसात आपली वेगळी छाप पाडलेली आहे. ज्यांना महाराष्ट्रसाठी काहीतरी करायची इच्छा आहे,ज्यांना विकासाची जाण आहे अशा व्यक्तीमध्ये मी प्रामुख्याने नाव सांगेल ते म्हणजे युवकांचे आशास्थान, कार्यकर्त्यांचे लाडके व्यक्तिमत्त्व, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे आहेत. आज महाराष्ट्राच्या राजकारणात आदरणीय पवार साहेबांनी लोकांच्या मनात जे स्थान मिळवले आहेत तसेच स्थान अजितदादांना मिळविण्यात यश लाभले आहे.अर्थात त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही महत्त्वाची आहे. निरनिराळ्या मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळालेल्या अजितदादांनी प्रत्येक गोष्टीत आपली स्वतःची अशी वेगळी छाप पाडलेली आहे. पवार साहेबांच्या मुशीत तयार झालेल्या दादांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना तेथील लोकांच्या अडीअडचणी, त्यांच्या गरजा याचा अभ्यास दादांना पक्का ठाऊक आहे. त्याचबरोबर त्याचे निवारण कसे करायचे याचेही त्यांना पक्के ज्ञान आहे. प्रशासनावर प्रचंड पकड असणारे अजितदादा स्पष्टवक्तेही आहेत. एखादे चुकीचे अथवा न होणारे काम असेल तर तिथल्या तिथे ते नकार देतात, एखाद्या अधिकाऱ्याला संबंधित काम दिले असेल तर ते वेळेत पूर्ण झालेच पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असतो.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांनी केली टीका, “मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने.”

आपल्या सर्वांना माहिती आहे की,नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर आले आणि मोदीं साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना फर्मान काढले. त्यानुसार कुठल्याही कार्यकर्त्याने वरिष्ठ नेत्यांच्या पाया पडायचे नाही, नमस्कार करायचा नाही, हार – तुरे द्यायचे नाही, असे त्यांनी बजावले. याला प्रसारमाध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. परंतु महाराष्ट्रात हा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खूप वर्षांपूर्वी घेतलेला आहे. देवगिरी या त्यांच्या शासकीय बंगल्यावर कुठल्याही कार्यकर्त्याने पाया पडू नये, हारतुरे देऊ नये अशा आशयाचा फलक लावलेला आजही दिसतो. दादा स्वतः या तत्त्वाचे पालन करतात आणि पक्षातील इतरांनाही याबाबत सातत्याने सांगत असतात. त्यांचे सांगणे असते की, हार -तुऱ्यांच्या ऐवजी चांगली चांगली पुस्तके द्या. हार – तुरे देऊन केलेल्या सन्मानापेक्षाही ग्रंथांचे मोल अधिक आहे. ग्रंथ हे माणसाचे गुरू असतात, असे दादा नेहमी सांगतात.

अधिक वाचा  अनिल अंबानी अडचणीत? रिझर्व बँकेने सुरू केली कायदेशीर प्रक्रिया

मंत्रालयातल्या शासकीय अधिकाऱ्यांवर दादांचा चांगलाच वचक आहे. दादांकडे कुठली फाईल जाताना ती व्यवस्थित स्वरूपात गेली नाही, ती अधिकारी नीट बघितली नसेल तर ते त्याला तिथेच खडसावतात आणि ते काम मार्गी लावतात. एकूण सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना दादांची शिस्त माहिती आहे. त्यामुळे दादांच्या कामाचा झपाटा खूप आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा – एक पर्यंत सतत लोकांच्या गराड्यात, घोळक्यात राहणे, त्यांच्याशी बोलणे, भेटणे, प्रश्न समजावून घेणे आणि त्याचे उत्तरही त्वरित शोधून काढत असताना राज्याचे व समाजाच्या व्यापक हिताचे भान सुटू न देणे ही तारेवरची कसरत आहे. ती अत्यंत सफाईने दादा करतात. त्यामुळे ते सांभाळीत असलेल्या मंत्रिपदाच्या प्रत्येक विभागातून दरवर्षी राज्याचे उत्पन्न वाढत चाललेल आपल्याला दिसते. एकाच वेळी प्रशासनातले अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता यांचा त्रिकोण बसविणे हे फार अवघड काम आहे. अशक्य कोटीतली गोष्ट आहे.पण ती लीलया दादांनी साधली आहे. एक अत्यंत कर्तव्यदक्ष सजग, सावध व आपल्या आतल्या आवाजाची प्रामाणिक राहणारे आणि चंदनाच्या उटीसारखं झिजणारे पण दुसऱ्यांना सुगंध देणारे असे हे ‘आरपार’ व्यक्तिमत्त्व उदंड आयुष्य लाभो.. त्यांना वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते..!

अधिक वाचा  रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता; आठवडाभर कोरडे हवामान

– डॉ सौ. सपना राऊत,अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस, बाळापूर