इतर मंत्र्यांच्या जनता दरबारापेक्षा दादांच्या जनता दरबाराला होणारी गर्दी कितीतरी जास्त असते. कारण सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की, दादा पटकन निर्णय घेतात. एखादे काम होणारे असेल तर ते काम लगेच करून देतात. एखादे काम होणारे नसले तर समोरच सांगतात हे काम होणार नाही. त्यामुळे सामान्य माणसांची परत परत मंत्रालयात होणारी फेरी वाचते.एकूणच या दादांच्या स्वभावामुळे दादांच्या मंत्रालयातल्या ऑफिसला तसेच दादांच्या जनता दरबारात खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांची गर्दी असते.

दादांच्या जनता दरबारात सर्वसामान्यांना मिळतो आधार – प्रशांत घुले

शिस्तबद्ध जनता दरबार काय असतो,याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादांचा जनता दरबार. अजितदादा पवार यांचा जनता दरबार नियोजनबद्ध असतो. गुरुवारी ठरलेल्या वेळेत म्हणजे सकाळी सात वाजता दरबार सुरू होतो. गुरुवारी दरबार होणार आहे की नाही, याची माहिती दोन दिवस आधीच राष्ट्रवादीच्या आयटी आणि मीडिया विभागामार्फत राज्यभरात पोहोचवली जाते. सकाळी सहा वाजल्यापासून लोक राष्ट्रवादी कार्यालयात जमायला लागतात. कार्यालयीन कर्मचारी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच नाव, दूरध्वनी क्रमांक, पत्ता याची नोंद करतात. प्रथम येणाऱ्याला प्रधान या तत्त्वानुसार नोंदणी झालेल्या प्रत्येकाला अनुक्रमांक दिला जातो. अनुक्रमांकाप्रमाणेच प्रत्येकाला आज सोडलं जातं. कार्यकर्त्यांनाच नव्हे तर बड्या नेत्यांना रांगेने जाऊनच आपले प्रश्न मांडावे लागतात.

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

तुम्हाला तुमचा कोणताही प्रश्न मांडायचा असेल तर तो लेखी निवेदनाच्या माध्यमातूनच. मौखिक तक्रार कोणाचीही घेतली जात नाही. कारण त्याचा पाठपुरावा करता येत नाही. अजितदादांना निवेदन दिल्यानंतर ते आधी त्याची पूर्ण माहिती घेतात. जे काम कायद्यात बसतं त्यावरच दादा लक्ष केंद्रित करतात. जे काम कायद्याच्या बाहेरचं म्हणजेच बदलीचं वगैरे असेल, तर त्याला तिथेच नाही म्हणून सांगितलं जातं. निव्वळ आश्वासण देणं हा राजकारण्यांचा मूलभूत गुणधर्म असला, तरी दादांच्या स्वभावातच ते नसल्यामुळे दरबारातील अशा गोष्टींना थारा दिला जात नाही.