सगळ्यात प्रथम अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा..! त्यांना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. तसेच महाराष्ट्र राज्यात विकासकामांच्या संदर्भात त्यांच्या कार्यकर्तृत्वाद्वारे त्यांचा वेगळा ठसा निर्माण व्हावा, यासाठी लाख – लाख शुभेच्छा..!

‘दादा’ उपाधीला शोभणारे अजितदादा –

अजित पवार साहेबांना सगळे लोक अजितदादा या नावाने ओळखतात. दादा या शब्दाला महाराष्ट्रात एक वेगळा आयाम आहे. दादा म्हणजे मोठा भाऊ. लहान भावाला सांभाळण्याची, त्याची काळजी घेण्याची तसंच त्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी मोठ्या भावावर असते. राजकारणाच्या संदर्भात बोलायचं तर महाराष्ट्राच्या संदर्भात दादा या शब्दाला एक वेगळ्या उंचीचा अर्थ वसंतदादांनी प्राप्त करून दिला. अत्यंत कमी शिक्षण असलेल्या वसंतदादांनी ज्या कौशल्याने मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार चालवला त्याला तोड नाही. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात अनेक राजकारणी झाले, मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्यापैकी कोणालाही दादा हे बिरुद लागलं नाही. हल्ली राजकारणातले अनेक नेते आणि छोटे-मोठे कार्यकर्ते आपल्या नावापुढे दादा हे बिरुद लावतात. पण आपल्या कामाचा धडाका आणि कर्तृत्वाने खऱ्या अर्थाने दादा हे बिरुद लावण्याची योग्यता अजितदादा पवार साहेबांनी मिळवली आहे.

अधिक वाचा  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा वाढ; पुन्हा 3 टक्क्यांनी हा भत्तावाढ?

अजितदादा पवार साहेब यांच्या कामाची धडाडी आणि निर्णय क्षमता बघून महाराष्ट्रातील अनेक युवक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. महाराष्ट्राची खरी ताकद ही युवक वर्गामध्ये आहे. युवकांच्या माध्यमातून आज समाजामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. राजकीयदृष्ट्या युवक प्रगल्भ होत असताना राजकीय व्यासपीठ म्हणून सामाजिक परिवर्तनासाठी तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ला प्राधान्य देतो हे विशेष.
बोले तैसा चाले या उपाधी प्रमाणे अजितदादा जे बोलतात तेच करतात.त्यामुळे त्यांनी मंत्री आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून कामाची मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या कामाचा झपाटा पाहिला की माणूस इतकं काम करू शकतो यावर विश्वासच बसत नाही. अजितदादा दिवसातून सुमारे अठरा तास काम करतात आणि विशेष म्हणजे कोणताही निर्णय तातडीने घेतात. मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा संपूर्ण राज्यात उमटवलेला आहे.

अधिक वाचा  सरस्वतीच्या ठेकेदारांवर शाई फेकल्याचा एवढा तांडव होणार तर सावित्रीवर शेण फेकल्याचा बदला तिचेच लेक घेणार. - प्रविण गायकवाड

अजितदादा हे वेळेचे पक्के आहेत. कोणत्याही बैठकीला किंवा कार्यक्रमाला ते वेळेवर हजर असतात. एकूणच वसंतदादा यांच्या नावातल्या दादा या शब्दाला शोभेल असं आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कर्तृत्वाच्या वारशाला साजेसं अजितदादांचा व्यक्तिमत्व आहे. अशा अजितदादांना उदंड आयुष्यासह वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा..!

– पै अशोक भाऊ न्हावले