अजितदादा पवार एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यात झटून काम करणारा कार्यकर्ता आहे, सामान्य माणसाचे प्रश्न समजण्याची क्षमता असणारा राजकीय नेता आहे, पक्षाला विजयपथावर नेण्याची क्षमता असणारे नेतृत्व गुण आहेत, प्रश्नांची उकल करून ते मार्गी लावण्याची शिस्त असणारा प्रशासक आहे. करडा प्रशासक आणि संवेदनशील राजकारणी हे रसायन फार अपवादात्मक असते. तुम्हाला लोकप्रिय राजकारणी व्हायचे असेल तर प्रशासनात ढिलेपणा येतो आणि प्रशासनात कठोरपणा आला तर अप्रिय राजकारणी अशी ख्याती होते. अजितदादा यांनी हा तिढा फार कौशल्याने सोडवलेला आहे.फक्त लोकानुनय करून सगळेच प्रश्न सुटत नसतात हे भान फार मोजक्या राजकारण्यांमध्ये असते. दीर्घकालीन व्यापक हितासाठी काहीशी अप्रियता स्वीकारावी लागली तर ती स्वीकारण्याची धमक अंगात असावी लागते, हा दुर्मीळ गुण अजितदादांकडे आहे. पक्षकार्य वाढविणे आणि आपल्या कडील खात्याला पुरेपूर न्याय देणे ही अजितदादांची ओळख आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील बदलांचा वेध घेण्याची क्षमता असणारे नव्या पिढीतील जी मोजके नेते आहेत त्यांच्यात अजितदादांची स्थान बिनीचे आहे. आज पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नेतृत्व करताना अजितदादांनी दूरदृष्टीचा विचार करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन समतोल विकास साधण्याचे काम केले आहे.महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून पुणे महापालिकेने नव्याने अनेक गावांचा समावेश करून उपनगरातील शहरीकरणाला बळकट करून विकासात्मक धोरण राबविले आहे,याचे सर्व श्रेय हे अजितदादांनाच द्यावे लागले. प्रशासनावर पकड, सर्वसमावेशक विकास साधण्याची कल्पकता आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची जाण ठेवणारा दूरदृष्टीचा नेता संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करत आहे, अशा आमच्या दादांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

अधिक वाचा  पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रं, मग शिवरायांचं कर्तृत्व का नाही? - अमोल कोल्हे

– प्रशांत भाडाळे