पवार घराण्याचा वारसा लाभूनही त्या वारसा हक्कावर थांबून न राहता स्वतःच्या कर्तुत्वाने, मेहनतीने, अभ्यासपूर्ण वृत्तीने आणि स्पष्टवक्तेपणाने प्रशासनावर जरब आणि पकड ठेवणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. सहकार, बँकिंग, कारखानदारी आणि शासन या सर्व स्तरावर यशस्वी वाटचाल करीत शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुतणे असूनही स्वतःची नवी, स्वतंत्र प्रतिमा महाराष्ट्र समोर ठेवणारे एक महत्त्वकांक्षी आणि धडाडीचा तरुण नेता म्हणून आजच्या काळात अजितदादा पवार यांचे नाव घ्यावे लागेल.

अजितदादांनी 1983 – 84 मध्ये स्वतः बाहेर राहून काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आपलं पॅनल निवडून आणलं. यानंतर 1984 मध्ये ते छत्रपती साखर कारखाना, भवानीनगरच्या संचालक मंडळावर निवडून आले. 1991 ची लोकसभा निवडणूक इतक्या लहान वयात प्रचंड मतांनी जिंकून अजितदादांनी भारतीय राजकारणात इतिहास निर्माण केला. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांना दिल्लीत जावे लागले. त्यामुळे लोकसभेवर काकांना निवडून देण्यासाठी अजितदादांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नाईक यांनी अजितदादांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश केला. यावेळी दादांना कृषी, जलसंवर्धन, ऊर्जा अशी महत्त्वाची खाती देण्यात आली. मिळालेल्या संधीचा उपयोग करून दादांनी राज्यातील अनेक कामे मार्गी लावली.

अधिक वाचा  ठाकरेंवर ममता बॅनर्जींना विश्वास; म्हणाल्या “आम्ही पुरुन उरलो, सरकारी दहशतवाद्यांचा महाराष्ट्रही…

तरुणांना राजकारणात काम करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. त्यासाठी तरुणांनी या क्षेत्रात उतरून नि:स्वार्थीपणे कष्ट करून समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेने त्याचे उतराई होण्यासाठी काम केले पाहिजे, अशी दादांची धारणा आहे. दादांनी अनेक तरुणांना राजकारणात उतरवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.तरुणच फक्त देशाचा कायापालट करू शकतील, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

त्यांच्या हातून आणखीन भरीव कामगिरी व्हावी, यासाठी अजितदादांना दीर्घायुष्य आरोग्य लाभो हीच प्रार्थना

– सुशील वाघमारे