उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म्स तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राज कुंद्रावर या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण समोर आल्यानंतर कलाविश्वात आणि सोशल मीडियावर राज कुंद्रा व पॉर्न रॅकेट या एकाच प्रकरणाची चर्चा रंगू लागली आहे. अनेकांनी गुगलवर पॉर्न म्हणजे काय? पॉर्न फिल्म्स पाहण्याचे दुष्परिणाम किंवा संबंधित अनेक गोष्टी सर्च केल्या आहेत. म्हणूनच, पॉर्न फिल्म्स किंवा व्हिडीओ पाहण्याचे दुष्परिणाम कोणते ते जाणून घेऊयात.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

वैचारिक क्षमतेवर परिणाम –

ज्या व्यक्ती पॉर्न व्हिडीओ किंवा फिल्मच्या आहारी गेल्या आहेत. त्यांच्या वैचारिक क्षमतेवर परिणाम होतो. अनेकदा या व्यक्तींच्या स्वभावात बदल होतो. त्याची विचार क्षमता, मानसिकतेवर विपरित परिणाम होतो. तसंच मनावर एखादा ताण असेल तर त्या ताणाचं प्रमाण वाढतं.

असंतुष्टतेची भावना –

पॉर्न पाहणाऱ्या व्यक्ती खऱ्या आयुष्यातदेखील त्याच पद्धतीचे शरीरसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होते. या व्यक्तींच्या मनात असंतुष्टतेची भावना निर्माण होते. त्यातून वैवाहिक कलह निर्माण होतात. पॉर्न फिल्म्समध्ये भडक दृश्यांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे जे समोर दिसतं ते प्रत्यक्षात नसतं हे कायम लक्षात घ्या.

अधिक वाचा  राज्य सरकारचा निर्णय: करोनाने मृतच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत

वैवाहिक जीवनावर परिणाम –

पार्न पाहणाऱ्या व्यक्ती आपल्या जोडीदाराकडूनदेखील त्याच पद्धतीची अपेक्षा करु लागतो. परंतु, अनेकदा ते शक्य होत नसल्यामुळे जोडीदारासोबत वाद होतात. विशेष म्हणजे अनेकदा या कारणावरुन लोक विभक्त झाल्याचीही प्रकरण घडली आहेत.

विकृत विचार –

सतत पॉर्न पाहिल्यामुळे त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होतो. व्यक्तींमधील विकृती वाढते. प्रत्येक स्त्री किंवा लहान मुलींकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. यामुळेच बलात्कार, अत्याचार अशा घटना घडतात.

ऑक्सिटोसिन हार्मोन्सची कमतरता –

मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन्स असतं. ज्याला लव हार्मोन्स असंदेखील म्हटलं जातं. पॉर्न पाहिल्यामुळे या हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्याची कमतरता निर्माण होते.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांचा हा सल्ला

लैंगिक क्षमतेवर परिणाम –

वारंवार पॉर्न पाहिल्यामुळे त्याचा परिणाम व्यक्तीच्या लैंगिक क्षमतांवर होतो. ज्यामुळे पुढे जाऊन अनेक शारीरिक समस्यांना आमंत्रण मिळू शकतं.

विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ –

विवाहबाह्य किंवा अवैध संबंधांमध्ये पॉर्न व्हिडीओ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. या व्यक्ती एका व्यक्तीसोबत खूश राहत नसल्यामुळे त्या दोन किंवा तीन व्यक्तींसोबतही शारीरिक संबंध प्रस्थापित करतात.