मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार मध्ये महत्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा दिला जात आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सांभाळणारे विभानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोलेंचे पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे सुरु आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यानंतर मविआच्या नेते मंडळींकडून आघाडी सरकारमध्ये कोणतीच बिघाडी नाहीये, अशा प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आल्या. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या दिल्लीवारीच्या चर्चांणा उधाण आलं आहे. त्यामुळं आघाडी सरकारमध्ये अंतर्गत धूसफूस सुरुच आहे की काय ? अशा चर्चांना तोंड फुटले आहे.

अधिक वाचा  ५०/५० ही पुडी.....हे तर पाच वर्षे पद; राऊत

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी राज्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या रणनितीबाबत खलबतं झाली. त्यानंतर याबाबतचा संपूर्ण तपशील काँग्रेस हायकमांडकडे सोपवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीला बोलवले जात आहे. मागच्या आठवड्यात काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अचानक दिल्लीला बोलावलं होतं. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊतही दिल्लीत जावून आले. तर सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दिल्लीत होते.

तसंच दोन- तीन दिवसांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीवारीमुळे राज्य मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस मविआ सरकारमध्ये त्यांच्या दोन मंत्र्यांना बदलणार असल्याच्यं बोललं जात आहे. त्यातच नाना पटोले यांन मंत्रीपद मिळण्याच्या चर्चाही आहेत. तसंच विधानसभा अध्यक्ष पदासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

अधिक वाचा  'स्वारद' फाऊंडेशन तर्फे भव्य किर्तन महोत्सव; मान्यवरांची सुश्राव्य कीर्तने

राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा

राज्य मंत्रीमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही तयारी सुरु आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानं दोन्ही पक्षामध्ये मंत्रीपद रिक्त आहे. राज्य मंत्रीमंडळामध्ये काँग्रेसचे दहा कॅबिनेट मंत्री तर दोन राज्यमंत्री आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये स्वगृही परतलेले माजी मंत्री सुनिल देशमुख यांनाही महत्वाचं पद दिलं जाण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे १६, शिवसेना १४ तर काँग्रेसकडे १२ कॅबिनेट मंत्रीपद आहेत.