पुणे- शहरात पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता असून, पुण्यासह पाच जिल्ह्यांत येत्या 48 तासांसाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत शहरात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुण्यासह रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 17 ते 26 किमी इतका असेल. तर पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

या जिल्ह्यांसाठी विभागातर्फे ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्‍यता असलेल्या विदर्भातील सुमारे 11 जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण आहे, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

अधिक वाचा  सरस्वतीच्या ठेकेदारांवर शाई फेकल्याचा एवढा तांडव होणार तर सावित्रीवर शेण फेकल्याचा बदला तिचेच लेक घेणार. - प्रविण गायकवाड