पुणे : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत होत असलेल्या मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करण्याच्या कामाच्या (जायका) निविदा प्रक्रियेतील अटी शर्थी ‘जायका ‘ने मान्य केल्या असून निविदा प्रक्रियेला येऊन जायका प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरूवात होणार आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मुळा-मुठा नदीसुधार योजने अंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. सुमारे बाराशे कोटी रूपयांच्या या प्रकल्पासाठी जपानच्या ‘जायका’ या कंपनीने 850 कोटी रुपये अर्थसहाय्य केले आहे. प्रशासनाने पुन्हा डीपीआरमध्ये तसेच निविदाच्या अटी-शर्थीमध्ये सुधारणा केल्या आहेत. तसेच या कामासाठी इच्छुक कंपन्यांनी केलेल्या सूचनांचाही त्यामधे समावेश करून अंतिम मान्यतेसाठी जायका कंपनीकडे पाठवल्या होत्या. जायकाने त्याला मान्यता दिली.

अधिक वाचा  राज्य सरकारचा निर्णय: करोनाने मृतच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत

जायकाने दिलेल्या तत्वतः मान्यतेसह सर्व अटी-शर्थी आज निविदेसोबत अपलोड करण्यात आल्या आहेत . याबाबत अधिक माहिती देताना महापौर म्हणाले, ‘पुढील चार आठवडे निविदा भरण्याची मुदत देण्यात आली असून त्यानंतर आलेल्या निविदा मान्य केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. जायका कंपनीच्या नियमानुसारच सर्व पूर्तता करण्याची तांत्रिक प्रक्रिया पार पाड़ावी लागली. ती आज पूर्ण झाल्याने निविदा प्रक्रिया अधिक वेगाने होईल. येत्या काही दिवसात नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरु होईल. प्रकल्पाचे काम विहित मुदतित पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील’.