पुणे : शहरातील वाढले वायू प्रदूषण कमी करण्यासह, शहरात ई- वाहनांचा चालना देण्यासाठी महापालिकेकडून शहरात ई -बाईक भाडेतत्वावर देणे तसेच या बाईक पुरविणा-या दोन कंपन्यांना या बाईक चार्जिंगसाठी शहरात 500 ठिकाणी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरी देण्यात आली होती. तत्कालीन शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी पुढाकार घेत मंजूर केला होता. त्यानंतर, हा विषय जवळपास वर्षभरापासून मुख्यसभेच्या मान्यतेसाठी पडून होता.

महापालिकेने विट्रो मोटर्स प्रा. लि. आणि ई- मॅट्रीक्‍स माईल या कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे शहरात विट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्वावर ई बाईक पुरविणे तसेच या कंपनीला शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनसाठी व बाईक पार्किंगसाठी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जून 2020 मध्ये यानंतर जुलै 2020 मध्येच स्थायी समितीने प्रशासनाकडून अभिप्राय घेतल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे खासदार कोल्हेंची कोल्हेकुई? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल

डिसेंबर 2020 च्या कार्यपत्रिकेवर असलेल्या या प्रस्तावामध्ये महापालिकेकडे ई बाईक्‍स पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या ई मॅट्रीक्‍स माईल या कंपनीचाही समावेश केला. आज या प्रस्तावाला सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या प्रकल्पामुळे शहरात सर्वसामान्यांना स्वस्त दरात ई -बाईक्‍स प्रवासासाठी उपलब्ध होणार असून खासगी वाहनांच्या वापर कमी होऊन वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.