भक्त पुंडलिकाच्या मातृ-पितृ सेवेसी पावन होऊन जो पांडुरंग युगे २८ पंढरीसी उभा आहे. त्याच पांडुरंगाची उद्या आषाढी एकादशी व माझा वाढदिवस या पूर्वसंध्येला भूगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षय सातपुते यांनी आज भुगाव गावातील ७९ वर्षांच्या श्रीमती इंदुबाई साधू मांढरे या मातेचे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आजन्म पालकत्व स्वीकारण्यात आले.

वयाच्या ७९ व्या वया पर्यंत आपल्या पतीची काबाड कष्ट करून सेवा केली. मातेस पुत्र प्रेम तर भेटले नाही पण पतीच्या सहवासातून दोन महिन्यांपूर्वी त्यांना देवाज्ञा झाल्याने ती पोरकी झाली. पण यापुढे त्यांना जनसेवा फाउंडेशनचे सर्व सदस्य कधीही पुत्र प्रेमाची जाणीव होऊ देणार नाही हा निश्चय करून त्यांचे आजन्म पालकत्व स्वीकारले. यामध्ये त्यांना दैनंदिन जीवनामध्ये वैद्यकीय सेवा असो अथवा जीवनावश्यक कोणतीही सेवा असो ही अखेरपर्यंत त्यांना पुरवली जाणार आहे.

अधिक वाचा  काँग्रेस नेत्यांचं प्रत्युत्तर; ममतांसह विरोधकांना हा सल्ला

इच्छा फक्त एवढीच की भक्त पुंडलिकाप्रमाणे पांडुरंगाचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहणाऱ्या आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या पाठीशी राहो व संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाचे महासंकट लवकरच दूर होवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना केल्याचे उपसरपंच अक्षय सातपुते यांनी सांगितले.