रांगोळ्याच्या पायघड्या….फुलांची आकर्षक तोरणे….माउली नामाचा अखंड गजर…..आकाशातून पुष्पांचा वर्षाव….अशा उत्साही वातावरणात आजोळघरातील माऊलींच्या चांदिच्या चल पादुका पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांनी हातात उचलून घेतल्या अन उपस्थित भाविकांनी पुंडलिका वरदे हरि विठ्ठलाचा जयघोष केला. पादुका घेवून जाण्यासाठीची शिवशाही बस आळंदीतील गरूड कुटूंबियांनी आकर्षक फुलांनी सजविली. आजोळघरातून माउलींच्या पादुका बाहेर आणल्यानंतर उपस्थीत ग्रामस्थ आणि वारक-यांनी पुंडलिका वरदे हरि विठ्ठलचा गजर केला. आणि माऊलींच्या पादुका बसमधे स्थानापन्न करून बस पंढरीच्या दिशेने ठिक सव्वानऊ वाजता मार्गस्थ झाली. यावेळी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मार्गावर आळंदीकरांनी रांगोळ्याच्या पायघड्या केल्या. दुतर्फा घऱातून तसेच गॅलरीतून आळंदीकर माउलींच्या दर्शनासाठी उभे होते.

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

शिवशाही आजोळघरापासून पंढरीकडे मार्गस्थ होताच आळंदीकरांनी जड अंतकणाने हात उंचावत माऊली माऊली चा गजर करून भावपूर्ण निरोप दिला. ठिक नऊ वाजता कर्णा वाजल्यानंतर पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर माउलींच्या पादुका घेत बसचे दिशेने निघाले. आणि उपस्थीतांनी माउलीनामाचा गजर केला. अवघ्या चाळिस लोकांना वारीसाठी परवानगी दिली.

पहाटे माउलींच्या पादुकांवर पवमान पुजा आणि दुधारती,अभिषेक केला. त्यानंतर मानाचे किर्तन झाले. किर्तनानंतर लगेचच पंढरीला जाण्याची तयारी सुरू झाली. संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा तब्बल सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून आज आषाढ शुद्ध दशमीला चल पादुकांसह मोजक्या वारक-यांच्यासमवेत सकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला. प्रत्येक आषाढी वारीला स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी निर्बंधात होत आहे.

अधिक वाचा  शनिदेवाची या राशीवरच विशेष कृपा; अन् मेहनती आणि दयाळूही

संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा तब्बल सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून आज आषाढ शुद्ध दशमीला चल पादुकांसह मोजक्या वारक-यांच्यासमवेत सकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला.