गेल्या २४ तासांपासून कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला आहे. यामुळे मुंबईत दोन ठिकाणी दुर्घटना घडली असून २४ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबईत पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आलीआहे. या काळात वाऱ्याचा वेगही 45-55 kmph ते 65 kmph एवढा असण्याचा इशारा देण्य़ात आला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबईला मुसळधार ते अति मुसळधार मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.

तसेच कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तिथेही अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबईत पुढील तीन ते चार तासांत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचणे, वेगवान वारे, रेल्वे-विमानांना अडथळे, पाणी-वीज पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता यामध्ये देण्यात आली आहे.

अधिक वाचा  सातारा जिल्हा बँक निवडणूक: नितीन पाटील यांची वर्णी कशी?; शिवेंद्रराजे मागे का पडले?