नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने त्यांना आतापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. पण तीनही वेळा ते विविध कारणांमुळे हजर राहिले नाहीत.

त्यानंतर ईडीने नुकतेच त्यांची ४ कोटींहून अधिकची स्थावर मालमत्ता जप्त केली. या घटनेनंतर काही तासांतच अनिल देशमुख हे भूमिगत झाल्याचे वृत्त टीओआयने दिले आहे. या कारवाईनंतर देशमुखांच्या शोधासाठी ईडीने आपली पथके तैनात केली आहेत. त्यातच महत्त्वाचे म्हणजे, अनिल देशमुख यांचा फोनही नॉट रिचेबल लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांनी केली टीका, “मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने.”