काबूल : अफगाणिस्तानमधील संघर्षाचे वृत्तांकन करणारे भारतीय वृत्त छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची आम्ही हत्या केलेली नाही, असा दावा तालिबानींनी केला आहे. दानिश यांचा मृत्यू कसा झाला याची कल्पना नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

तालिबानचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, युद्धभूमीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने आम्हाला त्यांची माहिती द्यावी. पाकिस्तानच्या सीमेलगत अफगाणी सैनिकांशी तालिबान्यांची जी चकमक झाली, त्याचे वृत्तांकन करताना गुरुवारी वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. अफगाणिस्तानच्या लष्करी सूत्रांनी सांगितले की, तालिबानींनी स्पिन बोलदाक येथील मुख्य बाजारपेठेचा भाग ताब्यात घेतला आहे, तो त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी संघर्ष सुरू होता.

अधिक वाचा  अमेरिकेत कोरोना उच्छाद : शाळा उघडल्याने मुलांचा वाढता आकडा

जामियाच्या कब्रस्तानात दानिश यांचा दफनविधी

अफगाणिस्तानात हत्या झालेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या पार्थिवावर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कब्रस्तानामध्ये दफनविधी करण्यात येणार आहे. या कब्रस्तानात खरेतर जामियाचे कर्मचारी, त्यांचे पती किंवा पत्नी, त्यांची अल्पवयीन मुले यांचाच दफनविधी केला जातो; पण हा नियम दानिश सिद्दीकी यांच्यासाठी बाजूला ठेवण्यात आला आहे.