पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ॲक्टिव्ह फाउंडेशन च्या वतीने जांभूळवाडी तलाव स्वछता अभियान ची सुरुवात करण्यात आली.ॲक्टिव्ह फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत लिपाणे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता अभियानाची सुरवात झाली.

जांभूळवाडी तलाव परिसरात अनेक नागरिक जॉगिंगसाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि अस्वच्छता झाल्याने जांभूळवाडी तलाव परिसरामध्ये प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.ही बाब लक्षात आल्याने ॲक्टिव्ह फाउंडेशनच्या कार्यकर्तेनी परिसर स्वच्छ करण्याची शपथ यावेळी घेतली.ॲक्टिव्ह फाउंडेशनआणि नागरिकांच्या सहकार्याने जांभूळवाडी तलाव स्वच्छता अभियान प्रत्येक रविवारी सकाळी राबविण्यात येणार आहे. अशी माहिती श्रीकांत लिपाणे यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा  आंतरविभागीय हॉकी स्पर्धेत पुणे ग्रामीण संघ विजयी