मराठा टायगर फोर्स MTF चे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा टायगर फोर्स आयोजित मांजरी बुद्रुक येथे भव्य रक्तदान शिबीर आणि वृक्षरोप वाटप समारंभ आयोजित केले होते. त्यामध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी आणि रक्तदात्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी रक्तदान स्थळी उपस्थित राहून रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा आणि सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना 200 रोपांचे वाटप त्यावेळी करण्यात आले.

कार्यक्रम स्थळी सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रात काम करणारे काही सन्माननीय मंडळी उपस्थित राहिले. अशा सर्व उपस्थितांचा प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संदीप लहाणे पाटील, तुषार घुले, निलेश काळे,विशाल लहाने, आकाश शिंदे,नवनाथ गुंजाळ, तात्या घिगे, अमोल जगताप,नितीन माने, माऊली कुमावत,सूर्यकांत माळी, गोपीचंद कोल्हे, नितीन जाधव, भाऊ वारे, मंगेश घाडगे, राहुल खराडे, अमोल घाडगे, अशोक खांडे, अजिनाथ कराळे, सोमा कराळे, सचिन खराडे,नाना डोईफोडे,मंगेश चौधरी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

अधिक वाचा  "पवारांना अडकवण्याचाच ममतांचा डाव, काँग्रेसविरोधातही कट सुरूच"