पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या कार्यक्रमादरम्यान गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

अत्यावश्यक वाहनांसाठी नियमांतून वगळले

लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार देहूरोड, निगडी, पिंपरी, भोसरी, आळंदी व दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मार्गावर तसेच देहू, आळंदी मंदिर व आजूबाजूच्या परिसरात 19 जुलै या दिवशी पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहने, डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, रुग्णवाहिका या सेवांना जमावबंदीमधून वगळण्यात आले आहे. दसेच देहूगाव, आळंदीमधील स्थानिक नागरिकांजवळ ओळखपत्र असेल तरच प्रवेश मिळणार आहे.

अधिक वाचा  न्यूझीलंडचा पहिला डाव 62 धावांतच आटोपला; फिरकीसमोर घसरगुंडी