भारतीय जनता पार्टी पुणे शहर आणि आकांक्षा नारी मंच यांचे संयुक्त विद्यमाने आज मोफत झुंबा डान्स क्लासेस चे उदघाटन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर , अध्यक्ष शिक्षण मंडळ पुणे मनपा, सिनेअभिनेत्री गौरी नाईक, पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक मा.स्नेहल जाधव, सौ.मनीषा दांगट, अध्यक्ष आकांक्षा नारी मंच, सौ.अश्विनी पवार, समन्वयक, कविता मोरे, सौ.बेबीताई दांगट, सौ.सुजाता दांगट, हेमांगिनी पाटणकर यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या .

दि क्लान फिटनेस वर्कशॅाप च्या संचालिका शालिनी पिडीहा या दर गुरूवार आणि शनिवार रोजी दुपारी ४ ते ५ वेळेत झुंबा डान्स क्लासेस घेणार आहेत . आज पहिल्याच दिवशी ५५ महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला . नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सिनेअभिनेत्री गौरी नाईक, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे आयोजन सचिन दशरथ दांगट, अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी पुणे शहर यांनी केले होते .

अधिक वाचा  घेरा सिंहगड गरिबांच्या संसारांवर वन विभागाचा हातोडा; धनदांडग्यांना अभय