वानवडी राखीव वन सर्वे नंबर ४९ येथील स्थित असणाऱ्या पुणे वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन मा. ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री वने, महाराष्ट्र राज्य, जी. साईप्रकाश, भा.व.से. वनबल प्रमुख, महाराष्ट्र राज्य, नागपूर, वाय. एल. पी. राव, भा.व.से., प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. सुनील लिमये, भाव से प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर, व मा. सुजय दोडल, भा.व. से. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक ) पुणे वन वृत्त यांची प्रमुख उपस्थिती होती.

अधिक वाचा  DCGI कडे सिरमचा अर्ज प्रलंबित ; अनेक देशात 'बूस्टर डोस'ला सुरुवात

या प्रसंगी उपस्थित माननीय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नूतनीकरण करण्यात आलेले कार्यालय कार्यक्षेत्रात हवेलीच्या भागाचा समावेश होतो. या कार्यालयामध्ये वनवणवा नियंत्रण, वन्यजीव व्यवस्थापनाकरिता ची अद्यावत अशी उपकरणे सह सुसज्ज करण्यात आलेली असून कार्यालय महाराष्ट्रातील सर्व वनपरिक्षेत्र कार्यालयाकरिता एक आगळंवेगळं कार्यालय ठरणार आहे.

वन्यजीव व्यवस्थापनाकरिता सदर कार्यालयाची निर्मिती श्री. राहुल पाटील, भा.व. से. उपवनसंरक्षक, पुणे यांचे योग्य नियोजन व मार्गदर्शनाखाली आशुतोष शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक व श्री. मुकेश सणस, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे यांनी केली असून त्यांनी केलेल्या कामाचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले. शेवटी मा. श्री. राहुल पाटील, भा.व.से., उपवनसंरक्षक, वन विभाग, पुणे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.