कोथरूड विधानसभेच्या माजी कार्यसम्राट आमदार वनदेवी टेकडीचे शिल्पकार प्राचार्य .मेधाताई कुलकर्णी यांची ‘भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष’पदी निवड झाल्या प्रित्यर्थ आज रविवार दिनांक २७ जून २०२१ रोजी श्रमिक फाउंडेशन व वनदेवी ट्रेकर्स तर्फे जेष्ठ साहित्यिक पर्यावरण अभ्यासक श्री.ल.म. कडू यांच्या हस्ते मेधा ताईंचा सत्काराचा कार्यक्रम वनदेवी टेकडी येथे सकाळी पार पडला.

यावेळी बोलताना मेधा ताई कुलकर्णी म्हणाल्या “टेकडी संवर्धनासाठी झटणाऱ्या सर्वांनी पुढे येणे गरजेचे असून हेच सर्व प्रशासनाचे कान, नाक हात, डोळे आहेत, तुमच्या मुळेच शासन आणि प्रशासनाला माहिती कळत असते. टेकडी संवर्धनाचा वसा पुढील पिढीसाठी आपणच हाती घेणे गरजेचे आहे. परिसरतील येणाऱ्या नागरिकांसाठी टेकटी परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, झाडांसाठी संरक्षण जाळ्या,झाडांसाठी ठिंबक सिंचनाची व्यवस्था,टेकडी परिसरात पोलिसांमार्फत पेट्रोलिंग सुरू करण्यासाठी प्राधान्यक्रमाने आपण सर्वांनी मिळून पाठपुरावा करूया,”

अधिक वाचा  गुजरात कॉलनीत ‘लहान करू होळी, दान करू पोळी’चा संदेश देत होळीचा सण उत्साहात साजरा

तसेच जेष्ठ साहित्यिक ल.म.कडू यांचा सत्कार महाराष्ट्र कृषी पर्यटन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे (दादा) व चेतन भालेकर यांनी केला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संतोष वरक, सचिनजी फोलाने, चेतन भालेकर, सामर्थ्य प्रबोधिनी चे सुशांत भिसे, अशोक कदम, जयवंत कामोठे, संतोष येनपुरे, अमित शिंदे, विकास कदम, प्रसाद शेळके, तनपुरे काका, वाघ काका, शिंदे काका, परेश सुतार, नवनाथ पोटवडे, संतोष कोंडके, तुळशीराम मकवान, बाळासाहेब वाघमारे, यशवंत जगताप, दत्ताजी रेणुसे, आदी सदस्य उपस्थित होते.