वेम्बली: घरच्या मैदानावर अखेर इंग्लंडला विजेतेपदाने हुलकावणी दिली. नियोजित आणि नंतर अतिरिक्त अशा 120 मिनिटांच्या खेळात सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्यानंतर इटलीने पेनल्टी शूट आऊटमध्ये इंग्लंडला 3-2 असे पराभूत केले आणि दुसऱ्यांदा युरो कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

प्रथम बोनुची आणि नंतर विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा गोलरक्षक गिआनलुईगी इटलीचे गेमचेंजर ठरले. होम की रोम ही सोशल मिडीयावरील चर्चा शूट आऊटने संपवली. युरो करंडक अखेर रोमला गेला. फुटबॉलसाठी स्पशेल ठरलेल्या रविवारी सकाळी अर्जेंटिनाले ब्राझीलचा पराभव करून विजेतेपद मिळविले. या विजयाने आपली सलग 34 सामन्यातील विजयी मालिका कायम राखली.

अधिक वाचा  शिराढोण येथील महारक्तदान शिबिरास ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद

फुटबॉलसाठी स्पशेल ठरलेल्या रविवारी सकाळी अर्जेंटिनाने ब्राझीलचा पराभव करून विजेतेपद मिळविले. कालच्या रविवारचे आणखी एक विशेष म्हणजे लंडनमध्येच एक स्वप्न साकार झाले, तर दुसऱ्याचे तुटले. विंबल्डनमध्ये नोव्हाक जोकोविचने 20व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या फेडरर आणि नदालच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे स्वप्न साकार केले. त्यानंतर वेम्बलीत इंग्लंड फुटबॉल संघाचे युरोचे पहिले वहिले विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंग पावले.