पुणे: एकच गोष्ट वारंवार सांगितली की खरी वाटायला लागते, याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिवसेंदिवस धादांत खोटे बोलत असून त्यांच्या या प्रसिद्धीच्या खेळाला आवर घालण्याची गरज आहे. पुणे शहरातील घराघरात आणि मनामनात भारतीय जनता पक्ष पोचलेला असून स्थानिक पातळीवर ती भारतीय जनता पक्षाची उंचावत असलेली प्रतिमा पाहूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे प्रसिद्धीचे खेळ करत असून त्यांनी या प्रकाराला त्वरित आळा घालावा अशी टीका पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी केली आहे.

शहरातील पुणेकर नागरिक सुज्ञ आहेत. राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणाला ते चांगलेच ओळखून आहेत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय काम केले असे विचारणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना खरी माहिती नसून फक्त ऐकीव माहितीच्या जोरावरच ही बेताल वक्तव्य केली जात असून राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कधीतरी चंद्रकांतदादांच्या कोथरूड मतदारसंघात यावे आणि दादांनी केलेल्या अफाट सेवाकार्याचा अभ्यास करावा. असे आव्हानच भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, गोविंदा, करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार, काँग्रेसचाही बडा नेता शिवसेनेच्या गळाला

कोथरूड हा अर्थात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असून यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्वही जिथे नाही तिथे कोणी काय काम केलं हे त्यांना कसं समजणार!? असा उपरोधिक टोला लगावून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फक्त माध्यमात सापडतात, कामाच्या नावाने शून्य ? असा आरोपही करण्यात आला आहे. दररोज पुणे शहरातील प्रसिद्धी माध्यमांसमोर पुणे मनपा ताब्यात घेण्याची वलग्ना करणाऱ्यांनी आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत आणि मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी च्या शहर अध्यक्षांनी प्रसिद्धी मिळवण्याचे पोरखेळ बंद करून स्वतःच्या पक्षातील अस्तित्वाकडे अधिक लक्ष द्यावे असा सल्ला भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक व संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिला आहे.