पुणे : मेट्रो आणि पीएमपी बससेवा इंटिग्रेटेड होणार आहे, त्यामुळे एकाच तिकीटात कोणत्याही पद्धतीने प्रवास करता येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ असेल तर नागरिकांकडून त्यास प्रतिसाद मिळतो. उच्च द्रुतगती उन्नत मार्गावर (एचसीएमटीआर) नियो मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्यास त्यासाठी निधी उपलब्ध होईल, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुणे महापालिकेतर्फे मध्यवर्ती भागातील वाहतूकीसाठी ‘पुण्य दशम’ या बससेवेचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथे झाले. यावेळी भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनिता वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  राजकीय पक्षांच्या खर्च नियंत्रणाची सर्व नियमावली ठरली; प्रचारक माणसांचा ‘रेट’ नाश्ता जेवण मंडप होर्डिंगचे हे दर

फडणवीस म्हणाले, १० रुपयात कुठे ही प्रवास करता येईल ही योजना कल्प आहे. यामुळे प्रदुषण, वाहतूक कोंडी कमी होईल. नागरिकांना बसची माहिती मिळावी यासाठी अॅप सुरू करावे. देशात सर्वाधिक इलेक्ट्रीक बसेस पुण्यात वापरल्या जातात. चांगल्या सुविधा देऊन लोकांना सार्वजनिक वाहतूकीची सवय लावली पाहिजे.
पुण्यात प्रस्तावित असलेल्या एचसीएमटीआर मार्गासाठी ‘नियो मेट्रो’ केल्यास मेट्रोच्या खर्चाच्या २५ टक्के रक्कमेत ती पूर्ण होते.

नियो मेट्रो केली तर केंद्र सरकारची मदत मिळेल

गेल्या साडे चार वर्षात पुढच्या ५० वर्षाचा विचार करून महापालिकेने योजनांची कामे सुरू केली आहेत. काहींचे काम ५० असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने, मुळीक यांचीही भाषणे झाली.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, गोविंदा, करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार, काँग्रेसचाही बडा नेता शिवसेनेच्या गळाला

बापट आपल्या मनासारखे होईल

केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले. पण त्यावर भाजपचे कमळ नाही, तरीही काही जण लस घेणार नाही म्हणाले. आता पुण्यात होणारी मेट्रो मोदीची आहे असे म्हणून बसणार नाही का असा टोला विरोधकांना लावत. पुढच्य महापालिका निवडणुकीत भाजपचे १०५ च्या पुढे नगरसेवक निवडून येतील. विरोधकांना १०० उमेदवार देखील निवडणूक लपविण्यासाठी मिळणार नाहीत अशी टीका केली. त्यावर फडणवीस यांनी बापट तुमच्या मनातील होईल, असे सांगत अनुमोदन दिले.