भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर घोषणा करताना मुळातच कवी मनाच्या आणि संघ विचारसरणीच्या मेधाताईंनी “धन्य भाग सेवा का अवसर पाया… चरणकमल की धूल बना मैं… मोक्ष द्वार तक आया… या चार ओळी मार्फत आपल्या भावना आणि पक्षनिष्ठा सिद्ध करत आपण या पदाला न्याय देणार याची प्रचिती सर्व पक्ष कार्यकारिणीला देण्याचा प्रयत्न केला.

मुळातच कोथरूड विधानसभा मतदार संघात उल्लेखनीय काम केल्यानंतरही आमदार मेधा कुलकर्णी यांना विधानसभेसाठी तिकीट नाकारून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना संधी दिल्यानंतर त्यांच्या नाराजी बाबत महाराष्ट्रभर चर्चा होती. पक्षातील हितचिंतकांना सह विविध राजकीय पक्षातील लोकांना ही मेधा कुलकर्णी यांच्यावर झालेल्या अन्यायाची हळहळ वाटत होती आणि त्यातच त्यांच्या पक्षांतर, नाराजी गोष्टींनाही पेव फुटत होते; काहीजण तर त्यांचे पक्षांतर निश्चित असून काही दिवसातच त्यांच्याकडून घोषणा होण्याची शक्यता आहे अशा वावड्या हेतूतः त्यांची बदनामी करण्यासाठी पसरत होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली भेट याला दुजोरा देण्याचे काम करत असतानाच आपण भारतीय जनता पक्षाशी बांधील असून पक्ष आदेशापेक्षा अन्य कोणत्याही गोष्टीला महत्त्व देणार नसल्याची भूमिका मेधा कुलकर्णी यांनी घेतल्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेला न्याय मिळाला आहे.

अधिक वाचा  मुंबईच्या या पठ्ठ्यामुळे ‘हार्दिक’ संघातूनच बाहेर? उपकरणदारपदी ‘वर्णी’ पण निवडीवर टांगती तलवार!

शिवसेनेचा बालेकिल्ला असा उल्लेख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात स्वतंत्र विधानसभा निवडणूक लडताना बहुसंख्य मताधिक्क्याने शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव करून मेधा कुलकर्णी यांनी कोथरूड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे याचा भ्रम दूर केला. आपल्या जनसंपर्काचा पुरेपूर वापर करत पुणे महापालिकेच्या निवडणुका व लोकसभेच्या निवडणुका यामध्येही ही भारतीय जनता पक्षाच्या मतदान मध्ये झालेली भरीव वाढ करून त्यांच्या कार्याची पोचपावती दिली होती. राष्ट्रीय स्तरावरील निर्णयाचा भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्यानंतर मेधा कुलकर्णी आणि भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी यांच्यामध्ये वितुष्ट वाढण्यास व दुर्लक्ष करण्यामध्ये वाढ झाली. निष्ठावान पण संघप्रवृत्ती उरी भरलेल्या मेधा कुलकर्णी यांना हा काळ अत्यंत जिकिरीचा काढावा लागला.

पक्षीय कार्यक्रमात त्यांना डावलण्यास सुरुवात झाल्यानंतर हळहळ सतत जाणवत असतानाच त्यांनी पुन्हा कोथरूड विधानसभा मतदार संघात पक्षीय कामाला सुरुवात करत प्रभागानुसार कामांची आखणी केली. पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दिलेल्या वागणुकीचा विचार न करता पक्षाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर अनेकांना त्यांचे हे  काम साशंक वाटत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराने त्यांनी कार्याला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी वरती उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली अन त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात करत पक्षनिष्ठा हीच आपली एकमेव ओळख असल्याचे जाहीर केले.

अधिक वाचा  ईडीची मोठी कारवाई, शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती जप्त

भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पक्षांतर्गत विषयाला महत्व न देता त्यांनी शहरातील विद्यमान आणि मान्यवर लोकांच्या गाठीभेटी घेत पक्ष हित आणि विचारसरणी यालाच आपण कायम प्राधान्य देत असल्याचा संदेश जाहीररित्या दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर साहेब, प्रदेश अध्यक्ष चंद्रकातदादा पाटील, सुधीर भाऊ मुनगंटीवार, पंकजा ताई मुंडे, विनोद तावडे, आशिषजी शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, विजयाताई रहाटकर, कांताताई नलावडे, खा. गिरीशजी बापट आणि महाराष्ट्रातील सर्व नेते या सर्वांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेच नेहमी मिळावे, मिळत राहील याची खात्री आहे… या सर्वांचे आभार मानत राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी झाल्याबद्दल खासदार गिरीशजी बापट आणि आदरणीय गिरिजा वहिनी यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. शहर भाजपा यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश भाऊ बापट, माजी आमदार बापू पठारे, सरचिटणीस गणेश घोष, महामंत्री युवा मोर्चा सुशील मेंगडे, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा भाजपचा अध्यक्ष पुनीत जोशी, प्रमोद कोंढरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय महिला मोर्चा ची पहिली ऑनलाईन बैठक राष्ट्रीय अध्यक्षा वानथी श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यावेळी “भाजपा केवळ राजकीय सत्तेसाठी काम करणारा पक्ष नसून जनसेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणारा पक्ष आहे “ असा मूलमंत्र त्यांनी दिला. आगामी कार्याची दिशा ठरविण्यासाठी दिल्ली येथे मा. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डाजी यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक होणार आहे.

अधिक वाचा  बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान बदललं जाणार नाही; नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला जवाब

मेधा कुलकर्णी यांच्या शब्दात भावना- 

विषेशतः मधल्या काळातील झाकोळून गेलेल्या मला यातून मा. देवेंद्र जी फडणवीस यांनी बाहेर काढले. जबाबदारी दिली,  काम दिले. आयुष्यभर सामाजिक कामात असलेल्या व्यक्तीला काम नसेल तर ते ग्रहण वाटते. माझी निष्ठा, तळमळ त्यांनी आणि पक्षाने जाणली. त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या क्षमतेच्या अत्युच्च पातळी पर्यत मी काम करेन, माझ्या जबाबदारीला न्याय देण्याचा आणि महिलांच्या हक्कांसाठी काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे पद मी व्रत म्हणून उपयोगात आणेन.. यातून मिळणारे समाधान हाच माझ्यासाठी मोक्ष असेल. म्हणूनच म्हणावेसे वाटते..

              धन्य भाग सेवा का अवसर पाया..
                              चरणकमल की धूल बना मैं..
                                             मोक्ष द्वार तक आया…